शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

ऑपरेशन करून नाही तर घरच्याघरी 'या' उपायांनी किडनी स्टोनपासून मिळवा सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 10:08 IST

मानवाच्या शरीरातील किडनी खूप महत्वाचा अवयव आहे.

मानवाच्या शरीरातील किडनी खूप महत्वाचा अवयव आहे. शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळे वेगवेगळे आजार उद्भवत असतात. किडनी स्टोन सुध्दा त्या आजारांपैकीच  एक आहे.  अनेकदा खाण्यापिण्याच्या चुकिच्या सवयींमुळे शरीराचं खूप नुकसान होत असतं. अनेकदा किडनी स्टोन झाल्यानंतर ऑपरेशन सुद्धा करावं  लागत असतं. या आजारात पोटात होत असलेल्या वेदना असह्य होत असतात.

पण तुम्हाला माहीत आहे का काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही किडनी स्टोनपासून सुटका मिळवू शकता. घरगुती वापरातील काही गोष्टींचा वापर करून तुम्ही किडनी स्टोनच्या समस्येला दूर ठेवू शकता.  चला तर मग जाणून घेऊया घरच्याघरी  उपाय करून कसा करायचा आजारांपासून बचाव.

जास्तीत जास्त पाणी पिणे

माणसाच्या शरीरात ७० टक्के पाणी आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचू शकते.   प्रत्येक व्यक्तीने कमीतकम दिवसातून  ७ ते ८ ग्लास पाणी पिणे महत्वाचे आहे.  जर तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्यायलात तुम्हाला स्टोन होण्याची समस्या उद्भवणार नाही. तसंच  समस्या उद्भवल्यास जर तुम्हाला झालेल्या स्टोनचा आकार लहान असल्यास  तो मुत्रावाटे निघून जाईल. 

राईचं तेल आणि लिंबाचा रस

जर तुम्हाला किडनी स्टोन झाला असेल आणि तुम्हाला कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय तो स्टोन काढायचा असेल तर  राईचे तेल आणि लिंबाच्या रसासारखा दुसरा कोणताही उपाय नाही.  लिंबाच्या रसात राईचं तेल मिक्स करून ते प्यायल्यास समस्या नष्ट होते. कारण त्यातील लिंबाचा रस स्टोन तोडण्यासाठी आणि राईचं तेल स्टोनला बाहेर काढण्यासाठी फायदेशीर ठरतं.

सफरचंदाचं व्हिनेगर

सफरचंदामध्ये  सिट्रिक एसिड असतं. जे किडनीत तयार झालेल्य स्टोनला तोडण्यासाठी फायदेशीर ठरत असतं.  किडनी स्टोन हा पुर्णपणे नष्ट होऊ शकतो.  व्हिनेगर शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी उपयोगी असतं  पण  त्याचे सेवन करण्याचे प्रमाण माहित असणं गरजेचं असतं.   सकाळच्यावेळी दोन लहान टिस्पून गरम पाण्यासोबत घेऊ शकता. 

डाळिंबाचे  सेवन 

एन्टीऑक्सिड्ंस डाळिंबात मोठ्या प्रमाणात असतात.  त्यामुळे आजारांपासून बजाव होतो. तंसच नैसर्गीकरित्या तुमचे आजार बरे करण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी डाळींब फायजदेशीर ठरतं असत. त्याचसोबत आवळ्याच्या सेवनाचा सुद्धा  शरीराला फायदा होत असतो. त्यासाठी दररोज सकाळी एक चमचा आवळा पावडर खा. असे केल्यास किडनी  स्टोनच्या समस्येपासून आराम मिळेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स