शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात सांधेदुखीपासून सुटका करण्यासाठी 'या' काही खास टीप्स वापराल तर फिट रहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 11:47 IST

हिवाळा सुरू झाल्यानंतर अनेकजणांना सांधेदुखी आणि अंगदुखीची समस्या उद्भवत असते.

हिवाळा सुरू झाल्यानंतर अनेकजणांना सांधेदुखी आणि अंगदुखीची समस्या उद्भवत असते. प्रत्येकाच्या सांधेदुखीची कारणं वेगवेगळी  असू  शकतात पण  वातावरणात गारवा वाढल्यानंतर जास्त त्रास होण्याची शक्यता असते कोणतीही क्रीम किंवा पेन रिलिफ लावल्यानंतर तेवढ्यापूरताच बरं वाटत असतं. नंतर पुन्हा गुडघेदुखी तसंच सांधेदुखीची समस्या उद्भवत असते. तर काही वेळा सूज सुद्धा येते. 

अशावेळी जर तुम्हाला सांधेदूखीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. कारण अंगदुखी संबंधित असलेल्या लहान मोठ्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा वाईट परिणाम होऊन आजार वाढण्याची शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊया सांधेदुखी होऊ नये म्हणून कोणते उपाय करायला हवेत.

हाडांची हालचाल

सायकलिंगमुले आपली हाडं रोटेशनल मोडमध्ये येत असतात. त्यातून पुरेशी पायांची हालचाल होत असते. त्यामुळे तुम्ही सायकलिंग करणं आवश्यक आहे. यामुळे तुमच्या पायांच्या किंवा मांड्यांच्या ज्या भागात दुखत असेल त्या भागात आराम मिळेल. तसंच शरीर लवचीक राहील. सकाळी चालायला जाणं जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की चालायला हवं. त्यामुळे तुमचं हृदय चांगलं राहिल.

तुपाचं सेवन करा

तर तुम्ही हिवाळ्यात तुपाचं सेवन कराल तर शरीरासाठी लाभदायक ठरेल. कारण त्यामुळे हाडांना पोषण मिळत असतं. तुपामुळे शरीराला नैसर्गिक घटक मिळतात. शिवाय तुपात ओमॅगा ३ फॅटी असतात ज्यामुळे सांध्यांचे कार्य सुधारते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

योगा करणे

रोजच्या जगण्यात तुम्ही जर योगाचा समावेश केलात तर शरीर सशक्त, चपळ आणि लवचिक बनेल. रोज न चुकता योगा केला तर तुमच्या शरीराच्या स्नायूंना बळकटी येईल. तुमच्या शरीराची ठेवण सुधारेल. उभे राहताना, बसताना, झोपताना आणि चालताना त्यात एक प्रकारचा डौल येईल. तसंच हाडं दुखण्याचा किंवा गुडघे दुखण्याचा त्रास कमी होईल. 

कोवळं ऊन 

(image credit-aqualaure)

हाडांची झीज होत असल्यास कॅल्शियमचे हाडांपर्यंत शोषण होण्यासाठी D व्हिटामीन्सची गरज असते. त्यासाठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे. तसंच संतुलित आहार घेणं सुद्धा तितकच महत्वाचं आहे. आहारात समतोल नसेल तर हाडं कमकूवत व्हायला लागतात. 

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य