शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात एखाद्या निरोगी व्यक्तीने किती पाणी प्यावे? जाणून घ्या योग्य पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 12:37 IST

वातावरणातील गरमी वाढल्याने पाणी अधिक पिणं गरजेचं असतं. चला जाणून घेऊ एका व्यक्तीने किती पाणी पिणं गरजेचं असतं. 

फेब्रुवारी महिना संपताच वातावरणात उष्णता जास्त जाणवू लागते. उन्हही वाढतं आणि वाराही गरम लागतो. या वातावरणात आरोग्याची योग्य काळजी घ्यावी लागते. असं केलं नाही तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. उन्हाळ्यात सगळ्यात महत्वाचं काम असतं शरीर हायड्रेट ठेवणं. वातावरणातील गरमी वाढल्याने पाणी अधिक पिणं गरजेचं असतं. चला जाणून घेऊ एका व्यक्तीने किती पाणी पिणं गरजेचं असतं. 

लाइफ लाइन आहे पाणी

चांगला आहार आणि स्वच्छ हवेसोबतच शरीरासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. शुद्ध, स्वच्छ पाणी हे शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया योग्यपणे चालण्यासाठी गरजेचं असतं. पाण्याने केवळ आपली तहानच भागते असं नाही तर हे संपूर्ण शरीरासाठी महत्त्वाचं असतं. अशात हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे की, आपल्याला कधी आणि किती पाणी प्यायला हवे. 

झोपेतून उठल्यावर

सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिणे चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. झोपेतून उठल्यावर एक ग्लास साधं पाणी किंवा कोमट पाणी प्यायल्याने आतड्यांना फायदा होतो. याने शरीराच विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत मिळते. तसेच रात्रभर पाण्याचं कमी झालेलं प्रमाणही याने नियंत्रित होतं. 

जेवणाआधी किती?

जेवण करण्याआधी पाणी प्यायल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल. याचा अर्थ तुम्हाला जेवण कमी करण्याची शक्यता राहणार नाही. जेव्हा तुम्ही हायड्रेट असता तेव्हा पोटही जेवणासाठी तयार झालेलं असतं. पाणी चवीच्या पेशींना जागं करतो आणि पोटालाही मॉइश्चराइज करतो. एक ग्लास पाणी प्यायल्याने जेवताना तुम्हाला फार पाणी पिण्याची गरज पडणार नाही. 

वर्कआउट करण्याआधी

तापमान आणि तुमच्या शरीरातील द्रव्य स्तराच्या आधारावर तुम्हाला वर्कआउट दरम्यान आणि नंतर डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी एक ग्लास पाणी पिण्याची गरज असते. याने तुमचा स्ट्रोकच्या समस्येपासूनही बचाव होऊ शकतो. 

वर्कआउटनंतर

वर्कआउटनंतर तुम्हाला घाम आणि लघवीच्या माध्यमातून खर्ची केलेल्या तरल पदार्थांची गरज असते. त्यासाठी तुम्हाला पाणी पिणे गरजेचं असतं. तुम्ही कोणत्याही वातावरणात व्यायाम करा, पण पाणी आवर्जून प्यावं.

बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यावर

जर तुम्ही आजारी लोकांच्या संपर्कात असाल तर वायरस आणि बॅक्टेरिया दूर ठेवण्यासाठी तुम्हाला सामान्यापेक्षा थोडं जास्त पाणी प्यावं लागेल. याने शरीर बॅक्टेरिया मुक्त होईल. याने तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल. 

आजारी असताना

जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताप असतो, कफ किंवा सर्दीची समस्या असते तेव्हा शरीरात पाणी कमी होतं. याने तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. अनेक तज्ज्ञ सांगतात की, अशा स्थितीत जर भरपूर पाणी सेवन केलं तर आजार लवकर दूर पळतो. 

थकवा येतो तेव्हा

थकवा हा डिहायड्रेशनच्या लक्षणांपैकी एक असल्याचं तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते तेव्हा थकवा जाणवतो. तुम्हाला ऑफिसमध्ये काम करताना थकवा जाणवत असेल तर एक ग्लास पाणी घ्या, तुमचा थकवा दूर होईल.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य