शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

मनात किती कचरा साठून आहे?...आणि का? त्याने मला साधा चहाही विचारला नव्हता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 08:27 IST

हे प्रसंग कधीच संपून गेलेत, ती परिस्थितीही कधीच बदलली आहे.

‘मी त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा त्याने मला साधा चहाही विचारला नव्हता. ’ – ही तीन वर्षांपूर्वीची गोष्ट!‘मला अमुक ठिकाणी जायचं होतं, बाबांना सांगितलं, समजावून सांगितलं पण त्यांनी मला त्यासाठी पैसे दिले नाहीत.’ – ही अडतीस वर्षांपूर्वीची गोष्ट!‘रुखवतात ही भांडी आहेत, पण ही भांडी नाहीत, असं तुमच्या घरच्यांनी आमच्या घरच्यांना बोलून दाखवलं होतं. -’ पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट!- या  गोष्टी  म्हटलं तर खूप छोट्या, क्षुल्लक ; तरीही लक्षात राहतात... का ? कशासाठी? हे प्रसंग कधीच संपून गेलेत, ती परिस्थितीही कधीच बदलली आहे.

‘त्या’च्या घरी चहा न पिणाऱ्याने नंतर किती तरी वेळा चहा प्यायला असेल. अडतीस वर्षांपूर्वी बाबांनी पैसे दिले नाहीत म्हणणारा माणूस आज नीट कमावतो आहे. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी त्याला जायचं होतं, तिथे तो अनेकदा जाऊनही आलेला आहे. पण तरी बाबांनी तेव्हा पैसे दिले नाहीत, हे शल्य मनात आहेच. रुखवताची भांडी घरातून कधीच विसरली गेली आहेत, पण मनात त्या प्रसंगाची बोच अजूनही आहेच!

अशा प्रकारच्या किती घटना अजूनही मनातली जागा अडवून बसल्या आहेत. या अशा वाक्यांमुळे मनातली ऊर्जा आजपर्यंत किती वेळा घटली आहे? नवीन कल्पना सुचायला, रोजची कामं चांगल्या पद्धतीने पार पाडायला, सकारात्मक विचार करायला, राग – चिंता अशा नकारात्मक भावनांना बळी न पडता सकारात्मक विचार करायला लागायला, आयुष्यात चांगले बदल करायला खूप कष्ट लागतात. आपण सर्वच जण विविध पद्धतीने आयुष्य घडवण्याचा, सजवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी उत्साह गोळा करत असतो. ऊर्जा निर्माण करत असतो. आसपासची आव्हानात्मक परिस्थिती, वेगळ्या वृत्तीच्या व्यक्ती आणि त्यांच्याशी घडलेले अप्रिय संवाद, अचानक समोर आलेले पेचप्रसंग आणि संकटं, उद्याच्या भविष्याच्या योजना – यात आपण कायमच व्यग्र असतो. असा सगळा विचार करण्यासाठी आपल्याला मानसिक – भावनिक ऊर्जेची गरज असते. अशा वेळी ऊर्जा घटवणाऱ्या अडगळीतल्या आठवणी जपून ठेवण्याची खरंच गरज आहे का?

- डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक shruti.akrodcourses@gmail.com

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य