शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करत असाल तर रोज किती चपात्या खाव्यात? जाणून उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 12:00 IST

Weight Loss tips : भारतीय आहारात चपाती आणि भात जास्त खाल्ला जातो. ज्यात कार्ब भरपूर असतात. वजन कमी करणारे लोक चपाती खाण्याबाबत फार काळजी घेतात.

Weight Loss tips : तुमचं जर वजन वाढलेलं असेल आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नात तुम्ही असाल तर आहारात काय असावं आणि काय नसावं हे फार महत्वाचं ठरतं. सामान्यपणे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणारे लोक कार्बचं सेवन कमी करतात. कारण कार्ब वजन वाढण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. मात्र, सोबतच हे एक महत्वाचं मायक्रोन्यूट्रिएंटही आहे. अशात याला आहारातून पूर्णपणे दूर करणंही चुकीचं ठरेल.

भारतीय आहारात चपाती आणि भात जास्त खाल्ला जातो. ज्यात कार्ब भरपूर असतात. वजन कमी करणारे लोक चपाती खाण्याबाबत फार काळजी घेतात. अशात अनेकांना प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी दिवसातून किती चपात्या खाव्यात? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

कार्ब्स, प्रोटीन आणि फॅटला मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणून ओळखलं जातं. शरीरातील वेगवेगळ्या क्रिया पूर्ण करण्यासाठी याची खूप गरज असते. सामान्यपणे एका छोट्या चपातीमध्ये जवळपास ७१ कॅलरी असतात. जर तुमच्या दुपारच्या जेवणात कॅलरीचं सेवन ३०० असेल तर तुम्ही दोन चपात्या खाऊ शकता. ज्यात १४० कॅलरी असतात. बाकी कॅलरी तुम्हाला भाजी किंवा सलादमधून मिळतात. केवळ चपाती किंवा भातच नाही तर तुम्ही खात असलेल्या भाज्या आणि फळांमध्येही कार्ब्स असतात.

एका दिवसात किती चपात्या खाव्यात?

तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही एका दिवसात किती चपात्या खाव्यात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे मुळात तुमच्या कॅलरी सेवनावर अवलंबून असतं. तसे वजन कमी करण्यासाठी तुम्ही एका दिवसात चार चपात्याचं सेवन करू शकता.

वजन कशाने कमी होईल?

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही ज्वारी किंवा बाजरीची भाकरी खाऊ शकता. या भाकरी गव्हाच्या चपात्यांपेक्षा हेल्दी असतात. यात जास्त पोषक तत्व आणि कार्बोहायड्रेट कमी असतात.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स