शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 11:16 IST

वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. इतकेच काय तर काही लोक जेवणही सोडतात. पण वजन कमी करण्यासाठी पोटभर जेवण करणं गरजेचं आहे.

वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. इतकेच काय तर काही लोक जेवणही सोडतात. पण वजन कमी करण्यासाठी पोटभर जेवण करणं गरजेचं आहे. जर दिवसभर तुम्ही थोड्या थोड्या वेळाने योग्य प्रमाणात काही खात राहिलात तर तुमचं वजन नियंत्रित राहिल. त्यासोबतच काही असे पदार्थ किंवा फळांचं सेवन करा ज्यामुळे तुमचं पोटही भरेल आणि कॅलरीजची चिंताही राहणार नाही. 

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये कॅचिंस नावाचं अॅंटीऑक्सीडेंट आढळतं. जे चरबी वाढवणाऱ्या सेल्सला कंट्रोल करतं. रात्री जेवणानंतर ग्रीन टी घेणे फायद्याचं ठरतं. ग्रीन टी सकाळी रिकाम्या पोटी कधीही घेऊ नये. वजन नियंत्रित ठेवण्यासोबतच ग्रीन टीमुळे डोळ्या खालील डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते. तसेच शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही ग्रीन टी प्यायल्याने वाढते. 

लिंबू पाणी, काकडी

शरीरातील नुकसानकारक टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी भरपूर पाणी पिणे हा सर्वात चांगला उपाय आहे. त्यामुळे रोज जास्तीत जास्त पाणी प्यावे. रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबूचा रस मिश्रित करुन प्यावे. यात तुम्ही मिंटही टाकू शकता. याने पचनक्रिया चांगली होती. त्यासोबतच काकडीमधी अॅंटी-इन्फ्लेमेट्री तत्वही डायजेशन चांगलं होण्यासाठी फायदेशीर आहे. यासोबतच वेगवेगळ्या फळाचे सेवन करा. 

बदाम आणि करवंद

बदामामध्ये व्हिटॅमिन इ अॅंटीऑक्सीडेंट्स, फायबर, प्रोटीन, मॅग्नेशिअम, कॅल्शिअमसारखे भूक कंट्रोल करणारे तत्व असतात. यांचे सेवन केल्याने पोट भरल्यासारखं राहतं. तेच दुसरीकडे करवंदामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर अधिक प्रमाणात असतात. याचाही फायदा वजन कमी करण्यास होते. 

दही

दही खाल्ल्यानं शरीरातील अधिक चरबी कमी होते. ताक दिवसातून दोन-तीन वेळा प्यायल्यास फायद्याचं ठरतं. दह्यामध्ये प्रोबायोटिक बॅक्टीरिया असतात. ते जेवण पचविण्यासाठी मदत करतात. दररोज जेवण करताना दही खाणे चांगले. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

(टिप- या पदार्थांचे किंवा फळांचे सेवन करण्यापूर्वी एक्सपर्टचा सल्ला अवश्य घ्या. कारण काहींना याची अॅलर्जीही असू शकते किंवा काहींना हे सूटही होणार नाहीत)

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स