शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्यासाठी फॉलो करा कॉफी डाएट, कशी ते जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 10:54 IST

वजन कमी करण्यासाठी कॉफी मदत करते. वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये कॉफीचा समावेश करण्याला कॉफी डाएट असं म्हणतात.

(Image Credit : nypost.com)

तुम्ही वजन कमी करण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये अशा पदार्थांचा नक्कीच समावेश असेल, ज्यांनी तुम्हीला वजन कमी करण्यास मदत मिळते. पण तुम्ही कधी कॉफीचा डाएटमध्ये समावेश केलाय? नसेल केला तर करावा असा सल्ला काही रिसर्चमधून देण्यात आला आहे. कारण वजन कमी करण्यासाठी कॉफी मदत करते. वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये कॉफीचा समावेश करण्याला कॉफी डाएट असं म्हणतात.

काय आहे कॉफी डाएट?

(Image Credit : Daily Express)

शरीरातून अतिरिक्त कॅलरी, चरबी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दर दिवशी एक ते तीन कप कॉफीचा डाएटमध्ये समावेश करावा लागेल. यालाच कॉफी डाएट असं नाव देण्यात आलं आहे. या कॉफी सेवनावर अधिक जोर दिला जातो. कारण याने वजन कमी करण्यास मदत मिळते. पण याचं सेवन फार जास्तही करू नये, कारण यातील कॅफीनमुळे आरोग्याला धोकाही होऊ शकतो. 

(Image Credit : LinkedIn)

एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, दररोज एक कप कॉफी प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत मिळते. याने चरबी कमी होण्यासोबतच कॅलरी सुद्धा बर्न होतात. तसेच कॉफीमध्ये भूक कमी करण्याची क्षमताही असते.

वजन कसं होतं कमी?

- या डाएट प्लॅनमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी जवळपास ३ कप हलक्या रोस्ट कॉफीचं सेवन करावं लागेल. हलकी रोस्ट कॉफीमध्ये डार्क रोस्ट कॉफीच्या तुलनेत अधिक पॉलीफेनोल अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात. त्यामुळे कॉफी डाएटमध्ये तुम्हाला हलक्या भाजलेल्या बियांची कॉफी प्यावी लागते. ही तुम्ही घरीच बारीक करून किंवा फिल्टर्ड पाण्याचा वापर करून तयार करू शकता. तीन कप कॉफीचं सेवन एका दिवसात करावं, पण त्यात साखर आणि क्रीमचा वापर करू नये. 

(Image Credit : Dr. Weil)

- सोबतच आहारही हेल्दी घ्यावा. यात हाय फायबरयुक्त पदार्थ, फळं आणि भाज्यांचा समावेश करा. लो कॅलरी किंवा चरबी असलेले हेल्दी स्नॅक्स, कडधान्य,  फायबर असलेली फळं आणि भाज्या भरपूर प्रमाणात खाव्यात. प्रोसेस्ड फूड्स आणि फ्रोजन फूड्सचं सेवन बंद करा. टोफू, ब्राउन राइस, ग्रिल्ड चिकन, सलाद इत्यादींचाही समावेश करा.

भूक होईल कमी

(Image Credit : Curiosity)

कॉफी डाएटमुळे तुमची भूक कमी होण्यासोबतच कॅलरीचं प्रमाण देखील कमी होण्यास मदत मिळते. तुम्हाला लवकर वजन कमी करायचं असेल तर जेवण करण्यापूर्वी एक कप कॉफी घेऊ शकतो. याने तुमची भूक कमी होईल आणि जास्त खाणार नाही.

(टिप : वरील लेखातील सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. तुमच्या डाएटमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स