शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्यासाठी जिम कशाला? घरातली काम करुनही घटवता येतं तब्बल 'इतके' वजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 17:58 IST

घरात झाडू-फारशी पुसणं, कपडे धुणं या गोष्टी तुम्ही कराल तर ते नक्कीच उपयोगी ठरेल. यातून वजन कमी करण्यासह पाठदुखी, पाय आणि कंबरदुखी यांपासूनही सुटका मिळू शकते.

वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग, व्यायाम आणि बऱ्याच गोष्टींची मदत घेतात. मात्र यासोबतच घरातली काही कामं करूनही तुम्ही वजन कमी करण्याचा वेग वाढवू शकता. (weight loss) हो, हे खरं आहे. घरात झाडू-फारशी पुसणं, कपडे धुणं या गोष्टी तुम्ही कराल तर ते नक्कीच उपयोगी ठरेल. यातून वजन कमी करण्यासह पाठदुखी, पाय आणि कंबरदुखी यांपासूनही सुटका मिळू शकते. सोबत वजन नियंत्रणात राहातं. हेल्दी डायट, योगा व्यायामासह घरकामातूनही फिट राहता येतं. जाणून घ्या या कामांबद्दल. (weight loss tips)

फरशी पुसणंतुम्हाला माहीत आहे का, की फरशी पुसताना तुम्ही जवळपास 145 कॅलरीज बर्न करता. हे ट्रेडमिलवर 15 मिनिट धावण्यासारखं आहे. मात्र तुमचे पाय किंवा पाठीत दुखत असल्यास बसून पुसा. यातून पायांचा व्यायाम होईल. तिथले फॅट कमी होऊन पाय टोन होतील. (weight loss through household works)

कपडे धुणंवॉशिंग मशीन आल्यानं कपड्यांवरील मळ काढणं आता सोपं झालं आहे. मात्र हातानं कपडे धुताना खूप कॅलरी बर्न केली जाऊ शकते. हे जवळपास 100 बैठका काढण्यासारखं आहे. यातून शरीर हेल्दी राहतं. (cooking and weight loss strategy)

जेवण बनवणंभाजी कापण्यापासून चपात्या लाटण्यापर्यंत जेवण बनवताना अशी अनेक कामं असतात ज्यात तुम्ही गुंतलेले असता. पूर्ण शरीर यात सहभागी होतं. 1 तासात तुम्ही जवळपास 150 कॅलरी बर्न करू शकता. 15 मिनिट केलेल्या एरोबिक्सइतक्याच कॅलरी यात जळतात. (cleaning home and weight loss)

डस्टिंग करणंटीव्ही, फ्रिज, टेबलावरची धूळ पुसणं हे काम तुम्ही केलं तर 30 मिनिटात 180 पर्यंत कॅलरीज बर्न होऊ शकतात. हे 15 मिनिट सायकलिंग करण्यासारखं आहे. असं केल्यानं शरीर फिट राहतं.

अंथरून टाकणंअंथरून टाकताना 15 मिनिटात 66 कॅलरी बर्न केल्या जाऊ शकतात. हे दीड किलोमीटर पायी चालण्यासारखं आहे. यातून हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. शरीर फिट राहतं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स