शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रनिंग करणं जमत नसेल तर घरीच ट्राय करा 'हे' व्यायाम, मिळतील सारखेच फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 10:31 IST

Home Workout Tips : घरात केलेल्या या व्यायामांनी सुद्धा धावण्या-चालण्याइतके फायदे मिळतात. या व्यायामांना कार्डिओ कॅटेगरीत टाकलं जातं.

Home Workout Tips :  रोज धावायला जाणं ही अनेकांची आवडत असते. धावणं हा एक संपूर्ण व्यायाम मानला जातो. वजन कमी करण्यासोबतच हृदय निरोगी ठेवण्यास याने मदत मिळते. पण पावसाळ्यात बरेच लोक बाहेर धावण्यासाठी जाऊ शकत नाहीत. सोबतच सगळीकडे चिखल, पाणी असल्याने घसरून पडण्याची भीती देखील असते. अशात तुम्ही घरातच अशा काही व्यायाम करू शकता. घरात केलेल्या या व्यायामांनी सुद्धा धावण्या-चालण्याइतके फायदे मिळतात. या व्यायामांना कार्डिओ कॅटेगरीत टाकलं जातं. आज आम्ही अशाच काही व्यायामांबाबत तुम्हाला सांगणार आहोत.

स्ट्रेचिंग करू शकता

घर कितीही लहान असलं तरी तुम्ही निदान हात-पाय चारही बाजूने स्ट्रेच करू शकता. तशी तर स्ट्रेचिंग कोणतीही एक्सरसाइज करण्याआधी केली जाते. पण घरी राहत असाल तर तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता. जर घरात लहान मुले असतील तर त्यांच्यासोबत स्ट्रेचिंग करण्यात तुम्हाला जास्त आनंद येईल. ही एक्सरसाइज करून तुमचा आळस लगेच दूर होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.

डान्स करा

जर तुम्हाला एक्सरसाइज करण्याचा कंटाळा येत असेल किंवा एक्सरसाइज करायचीच नसेल तर तुम्ही घरातील लहान मुलांसोबत दिवसातून 20 ते 30 मिनिटे आवडत्या गाण्यावर डान्स करू शकता. डान्स करणं ही सर्वात बेस्ट एक्सरसाइज मानली जाते. कारण इतर एक्सरसाइजमध्ये तुम्ही ठराविक अवयवांची हालचाल करता, पण डान्सिंगने तुमच्या संपूर्ण शरीराची एक्सरसाइझ होते. 

स्पॉट रनिंग

धावणं आरोग्यसाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला बाहेर रनिंगला जायला मिळत नसेल तर घरीही तुम्ही रनिंग करू शकता. तुम्ही घरात स्पॉट रनिंग करू शकता. स्पॉट रनिंग म्हणजे एकाच जागेवर रनिंग करणे. स्पॉट रनिंगचा फायदा हा आहे की, याने ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. तसेच स्पॉट रनिंगने मांड्या, पोट आणि कंबरेवरची चरबी कमी होते.

स्व्कॉट्स

स्व्कॉट्स सुद्धा तुम्ही घरीच छोट्याशा जागेत करू शकता. ही घरी करण्यासाठीची सर्वात चांगली एक्सरसाइज मानली जाते. याने तुम्हाला मांड्या आणि गुडघ्यांना फायदा मिळतो. त्यासोबत पोटावरील चरबी कमी करण्यासही ही एक्सरसाइज मदत करते. या एक्सरसाइजचे तुम्ही 15 चे 3 सेट मारू शकता. याने पोटाचा घेर कमी होईल.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सExerciseव्यायामHealth Tipsहेल्थ टिप्स