शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

डोळे चांगले ठेवण्यासाठी वापरा 'हे' घरगुती उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 09:59 IST

सध्याच्या काळात खूप लोकांना चष्मा लागलेला आपल्याला दिसून येतो.  

 सध्याच्या काळात खूप लोकांना चष्मा लागलेला आपल्याला दिसून येतो.   लहान, मोठ्या तसंच मध्यम वयाच्या लोकांमध्ये सुद्धा ही समस्या सर्वाधिक जाणवते.  वयामानानुसार  डोळे कमजोर होणे किंवा  मोबाईल, लॅपटॉप स्क्रीनचा अतिवापर करणे.  यांमुळे चष्मा वापरत असलेल्या लोकांच्या प्रमाणात वाढ होत आहे. काही लोकांना चष्मा लावायला जराही आवडत नाही तरी त्यांना समस्या जाणवल्यामुळे  त्यांना नंबरचा चष्मा लावावाच  लागतो. जर तुम्हाला सुद्धा चष्मा असेल आणि तुम्हाला तो वापरण्यातची जराही ईच्छा नसेल  तर आज आम्ही तुम्हाला काही  उपाय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही चष्मा लावणं सोडू शकता . तसंच ज्यांना चष्मा नसेल असे लोकं आपले डोळे अधिक चांगले ठेवू  शकतात. चला तर मग जाणून घेऊया  काय आहेत डोळ्यांसाठी फायदेशीर असलेले घरगुची उपाय. 

कोथिंबिरीचा रस

कोथिंबिरीच्या रसाचा वापर करून तुम्ही डोळ्यांचे सौंदर्य परत आणू शकता.  आत्तापर्यंत कोथिंबिरीचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील  पण जर जेवणात वापर करत असताना याच कोथिंबिरीचा वापर तुम्ही वेगळ्या पद्धतीने केलात तर डोळ्यात सुधारणा होईल. यासाठी ताज्या कोथिंबिरीचा रस काढून घ्यावा. हा रस दररोज डोळ्यात घालून डोळे  १० मिनिट बंद करून ठेवावेत.  असे केल्यास डोळ्यांच्या समस्येत  सुधारणा दिसून येईल.

गाजराचा रस  

 

गाजर हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायद्याचे असते. सध्या हिवाळा  सुरू असल्यामुळे गाजरं बाजारात सहज मिळतात. याच  गाजरांचा वापर तुम्ही डोळ्यांसाठीसुद्धा करू शकता. डोळ्यांच्या दृष्टीने महत्वाचे असे आहे. गाजरात व्हिटामीन ए असतं. तसंच   दररोज सकाळी गाजराचा रस प्यायल्यास डोळ्यांसाठी फायद्याचं ठरेल. 

त्रिफळा पावडर

एक टिस्पून त्रिफळा पाऊडर एक ग्लास पाण्यात मिसळा आणि  रात्रभर हे असंच राहू द्या. पुढच्या दिवशी सकाळी  या पाण्याला गाळून घ्या आणि  या पाण्याने आपले डोळे धुवा. डोळे धुवत असताना पाणी साफ असेल याची खबरदारी बाळगा. एक महिना हा प्रयोग केल्यास डोळ्यांमध्ये फरक दिसून येईल. 

राईचे तेल

खाण्यासोबतच राईच्या तेलाचा वापर केसांसाठी सुद्दा केला जातो.  पण तुम्हाला माहित आहे का डोळे चांगले राहण्यासाठी  राईचे तेल फायदेशीर ठरते. यासाठी राईचे तेल  गरम करून दररोज रात्री पायांच्या तळव्यांना घासा. राईचं तेल तळपायांना लावून मसाज केल्यास डोळे चांगले राहतील.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स