शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

​हिवाळ्यातील आजारांवर घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2016 17:16 IST

उन्हाळा आणि पावसाळ्याचा आनंद घेतल्यानंतर सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या हिवाळ्याची नुकतीच चाहूल लागली आहे. हिवाळ्यातील हुडहुडी भरायला लावणाऱ्या गुलाबी थंडीत स्वेटर, मफलर तसेच लहान मुलांच्या कानटोप्या, पायमोजे बाहेर येऊ लागतात.

-Ravindra Moreउन्हाळा आणि पावसाळ्याचा आनंद घेतल्यानंतर सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या हिवाळ्याची नुकतीच चाहूल लागली आहे. हिवाळ्यातील हुडहुडी भरायला लावणाऱ्या गुलाबी थंडीत स्वेटर, मफलर तसेच लहान मुलांच्या कानटोप्या, पायमोजे बाहेर येऊ लागतात. वातावरणातील गारव्यामुळे इतर ऋतूंच्या तुलनेने हिवाळ्यात पचनशक्ती वाढून भूक चांगली लागते. म्हणून या काळात समतोल आहार घ्यावा आणि आरोग्य सुदृढ ठेवावे. हिवाळा आरोग्याच्या दृष्टीने जरी चांगला मानला गेला आहे, तरी या ऋतूत बरेच जुनाट आजार डोके वर काढतात. आजच्या सदरात अशा आजारांवर घरगुती काय उपाययोजना करावी याबाबत जाणून घेऊया...या ऋतूत शरीरातील रुक्षता वाढते म्हणून आहारात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण वाढवावे. त्यात विशेषत्त्वाने काजू, बदाम, अंजीर, आक्रोड, खारीक, खोबरे, बेदाणे इत्यादी पदार्थांचं सेवन आपल्या प्रकृतीनुसार वाढवावे. तसेच डिंक, सुकामेवा, बेसन, मेथी इत्यादींचे साजूक तुपात तळलेले लाडू शरीराला बलवर्धक ठरतात. हिवाळ्यात दिवसाच्या तुलनेने रात्र मोठी असल्याने वारंवार भूक लागते, त्यामुळे सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्रीचं जेवण गरमागरम आणि पौष्टिक घ्यावं. या काळात सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळे, फळांचा रस सेवन करावा.  त्वचेच्या समस्या हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम त्वचेवर होतो. रात्री गारवा आणि दिवसा कडक ऊन असते. त्यामुळे परिणाम होऊन त्वचेच्या समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते. अशा वातावणामुळे त्वचेतल्या तैलग्रंथी निष्क्रीय होऊन त्वचा निस्तेज आणि रखरखीत बनते. चेहऱ्यावर सुरकुत्या, त्वचा फाटणे, ओठ फुटणे अशा तक्रारी वाढतात. अंघोळीनंतर क्रीम ऐवजी खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचा वापर करु शकता. त्वचेची कांती स्निग्धता टिकवून ठेवण्यासाठी आहारात मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सलादचे प्रमाण वाढवावे. चेहरा सतेज होण्यासाठी पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावावा. तसेच चेहऱ्याचा काळवंडलेपणा घालविण्यासाठी संत्र्याचा रस, संत्र्याची साल, काकडीचा रस चेहºयावर लावावा. साय किंवा तुपात चंदन टाकून रात्री झोपताना मालिश केल्यास त्वचेला तेज प्राप्त होते.    दमाज्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांना हिवाळ्यात छातीत कफ साचल्याने खूप त्रास होत असतो. म्हणून या ऋतूत अशा व्यक्तींनी दही, ताक, दूध, मिठाई , थंड पाणी, आईसक्रीम, कोल्ड टी तसेच कोल्ड कॉफी तसेच विविध शीतपेये अजिबात घेऊ नयेत. त्रास अधिक होऊ नये म्हणून पाणी सहसा कोमट करून प्यावे तसेच सुंठ आणि मध किंवा आल्याचा रस आणि मध हे मिश्रण घ्यावे. वमन केल्यानेही दम्याचा त्रास कमी होतो. तसेच रात्री झोपताना आणि सकाळी अंघोळीपूर्वी छातीला तीळतेल, महानारायण तेल लावून दररोज शेक घेतल्यास छातीत साचलेला कफ मोकळा होतो. रात्री झोपताना किंवा सकाळी दम्याचा त्रास असणाºयांनी २ ते ३ कप पाणी घेऊन त्यात तुळस, अडुळशाची प्रत्येकी दोन पाने टाकावी आणि एक कप काढा राहील अशा रितीने उकळून कोमट काढा घ्यावा. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्राणायाम, कपालभारती केल्यास नक्कीच फायदा होतो. हातापायाच्या तळव्यांना भेगाहिवाळ्यात शरीरात रुक्षता येत असल्याने हातापायांच्या तळव्यांना भेगा पडतात. बºयाचदा या भेगातून रक्तही येतं आणि खूप वेदनाही होतात. या ऋतून आपण रुक्षान्नाचे अतिसेवन करत असल्याने भेगा पडण्याचा आजार वाढतो.  हा त्रास वाढू नये यासाठी आहारात साजूक तुपाचा समावेश करावा. आहारात दूध, तुपासारखे स्निग्ध पदार्थ वाढवावेत. लोणचे, मिरचीचा ठेचा तसेच अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावेत. जागरणामुळेही शरीरात रुक्षता वाढत असल्याने रात्री जागरण करणं टाळावं. रात्री झोपताना भेगांना साजूक तूप लावावे. चंदन, लाख, ज्येष्ठमध त्याचप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने विविध औषधी तेल भेगांवर लावावीत. ज्येष्ठमध साजूक तुपात टाकून पिल्यामुळंही भेगांचा त्रास कमी होण्यास मदत होते.  सांधेदुखीविशेषत: हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास जास्त सतावतो. या काळात अशा लोकांनी विशेष काळजी घ्यावी. यासाठी सांध्यांना थंड हवा लागू देऊ नये त्याचप्रमाणे पायांना, हातांना मोजे वापरावेत. थंड पाण्यात काम करणं टाळावं. शिळं आणि थंड अन्न घेऊ नये. बटाटे, उसळी, ब्रेड तसेच बेकरीचे पदार्थ, डाळी आणि डाळींच्या पीठाचे पदार्थ टाळावेत. मांसाहार पूर्णत: वर्ज्य करावा. गरम, ताजे अन्न घ्यावे. थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी प्यावं. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यानी थंडीच्या दिवसांत अतिश्रम करणं टाळावं. रात्री झोपताना सांध्यांना एरंडेल तेलाने मालिश करावं. विविध प्रकारचे गुग्गुळ, दशमुळांचा काढा तसेच इतर वनौषधींचा उपयोग वैद्यकीय सल्याने केल्यास सांधेदुखीचा त्रास आपण टाळू शकतो.