शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Acidity दूर करण्याचे खास घरगुती उपाय, एकदा कराच मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 10:27 IST

Acidity Home Remedies : काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या पचनासंबंधी समस्या दूर करू शकता. हे उपाय तुम्ही मसाल्याचे किंवा तेलाचे पदार्थ खाल्ल्यावर झालेल्या डॅमेजला सुधारण्याचं काम करतात.

Acidity Home Remedies : काही खाल्ल्यानंतर गॅस आणि अ‍ॅसिडिटी होण्याची समस्या अनेकांना होते. ही समस्या कॉमन असली तरी यामुळे अनेकांना वैताग येतो. कामे व्यवस्थित होत नाहीत. अशात या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या पचनासंबंधी समस्या दूर करू शकता. हे उपाय तुम्ही मसाल्याचे किंवा तेलाचे पदार्थ खाल्ल्यावर झालेल्या डॅमेजला सुधारण्याचं काम करतात.

जेवणानंतर कोमट पाणी

जर तुम्हाला वाटत असेल की, मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर सकाळी तुम्हाला जुलाब होऊ नये तर जेवणानंतर कोमट पाणी नक्की प्यावं. कोमट पाण्याने पचनक्रिया वेगाने आणि सहजपणे होते.

चहा, कॉफी, ग्रीन टी फायदेशीर

जेवणानंतर चहा किंवा कॉफीचं सेवन करणं फायदेशीर असतं. यात फ्लेवोनोइड भरपूर प्रमाणात असतं, जे पचनक्रियेत ऑक्सीडेटिव लोडला संतुलित करण्यासाठी अ‍ॅंटीऑक्सीडेंट बनवतं.

दही फायदेशीर

आयुर्वेदात जेवण केल्यानंतर दही खाण्याचा सल्ला दिला जातो. दह्यातसोबत भाजलेलं जीरं पचनक्रियेला बूस्ट करतं. दह्यात असलेल्या प्रोबायोटिक्स लॅक्टोबेसिलस बॅक्टेरिया अ‍ॅसिडिटीला कमी करण्यासोबतच आतड्यांना अन्न पचवण्यास मदत करतं.

फायबरने पोट होतं साफ

जास्त तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाल्ल्यानंतर हलकं आणि फायबरयुक्त जेवण पोटासाठी आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. फायबरयुक्त आहार पोटाची सफाई करण्यास मदत करतं. तसेच तेलकट खाल्ल्यानंतर पचनक्रियेचं झालेलं डॅमेजही कंट्रोल करतं. अशात दलिया आणि ओट्सचं सेवन करावं.

ड्रायफ्रूट्सचं करा सेवन

काजू, बदाम, पिस्ता, शेंगदाणे, मनुके, खजूर, सुपारीसारख्या ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतं. याने पचनक्रिया मजबूत करण्यास मदत मिळते.

ओव्याचं पाणी

ओव्याचं पाणी जेवण केल्यानंतर सेवन करणं हा गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा घरगुती उपाय आहे. कोमट पाण्यात एक चमचा ओवा टाकून सेवन केल्यास पचनसंबंधी समस्या दूर होतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य