शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात त्वचेवर येणारी खाज रोखण्याचे खास अन् सोपे घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 16:59 IST

Summer Tips : तुम्हालाही या त्रासाला सामोरे जावे लागत आहे आणि त्रस्त झाला आहात तर त्यावर उपाय म्हणून आम्ही काही टिप्स तुम्हाला देणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही या त्रासावर मात करु शकाल.

Summer Tips :  नुकतीच उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे लोक या दिवसांमध्ये काय काय काळजी घ्यावी हे जाणून घेत आहेत. उन्हाला सुरू होताच गरम होणे, खूप घाम येणे आणि त्यासोबतच अंगाला खाज येणे अशा वेगवेगळ्या समस्या होत असतात. उन्हाळ्यात अंगाला खाज येणं ही समस्या फार चिडचिड वाढवणारी असते. काही लोकांना तर खाजेसोबत अंगावर घामोळ्याही येतात. अशात चिडचिड अधिक वाढते. 

त्वचेला येणारी खाज आणि घामोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणे अत्यंत गरजेचे असते. तुम्हालाही या त्रासाला सामोरे जावे लागत आहे आणि त्रस्त झाला आहात तर त्यावर उपाय म्हणून आम्ही काही टिप्स तुम्हाला देणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही या त्रासावर मात करु शकाल. चला तर मग पाहूयात काय आहेत हे उपाय…

-  उन्हाळ्यात येणारा घामाचा वास, अंगाला खाज येणे तसेच जळजळ होण्यासारखे प्रकार रोखण्यासाठी दररोज स्वच्छ आणि ताज्या पाण्यात आंघोळ करावी. पाण्यात काही कडूलिंबाची पाने टाकल्यास फार उत्तम.

- उन्हाळ्यात त्वचेवर मुलतानी माती त्वचेसाठी खुपच फायदेशीर ठरते. जर तुमच्या अंगावर घामोळ्या झाल्या असतील तर मुलतानी मातीचा लेप लावावा त्यामुळे नक्कीच आराम मिळतो.

- त्वचेला येत असलेल्या खाजमुळे अनेकजण त्रस्त असतात यावर घरगुती उपाय म्हणजे बर्फाचे तुकडे खाज येणा-या जागेवर लावावेत. यामुळे काही प्रमाणात आराम मिळतो. तसेच बर्फाचे तुकडे एका कपड्यात गुंडाळुन पाच ते दहा मिनिटांपर्यंत खाज येत असलेल्या जागेवर लावावे. चार ते सहा तासांच्या अंतरामध्ये अशा प्रकारे तुम्ही बर्फाचे तुकडे खाज येत असलेल्या जागेवर लावू शकता. 

- शरीराला येत असलेली खाज थांबविण्यासाठी मीठ, हळद आणि मेथी यांचे मिश्रण करा. तसेच हे मिश्रण आंघोळीपूर्वी अंगावर पाच मिनिटांपर्यंत लावावे. त्यानंतर पाच मिनिटांनी आंघोळ करावी. आठवड्यातून एकदा अशा प्रकारे उपाय केल्यास त्वचेला होणारी जळजळ आणि खाज रोखण्यास मदत होते.

- उन्हापासून वाचण्यासाठी त्वचेचा रुक्षपणा कमी करण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरू शकते. त्वचेवर कोरफड जेलसुद्धा लावता येऊ शकते. 

 

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य