शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती उपायांनी दुर करता येत युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, महिलांनी घ्या ही विशेष काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 15:30 IST

यूटीआयपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही येथे सांगितलेल्या या घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.

लोकांना यूटीआय म्हणजेच मूत्रमार्गात संसर्ग होणे सामान्य झाले आहे. हा संसर्ग पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकतो, परंतु बहुतेकवेळा हा स्त्रियांनाच जास्त होतो. स्वच्छतेची काळजी न घेणे हे त्याचे मुख्य कारण असल्याचे मानले जात असले तरी, त्याच्या इतर कारणांमध्ये गर्भनिरोधकांचा अतिवापर, लघवी पूर्णपणे न होणे, जुलाब, स्टोन येणे, रजोनिवृत्तीचा कालावधी, रोग प्रतिकारशक्तीचा कमी असणे, अँटिबायोटिक्स घेणे यांचा समावेश आहे. इतर काही कारणे जसे की औषधे, अति खाणे.

यूटीआय संसर्ग ई-कोलाय बॅक्टेरियामुळे होतो आणि जेव्हा मूत्राशय आणि लघवीच्या नळ्यांना जीवाणूंचा संसर्ग होतो तेव्हा होतो. UTI ची अनेक लक्षणे असू शकतात, जसे की मूत्राशयाच्या आवरणाला सूज येणे, लघवी करताना वेदना होणे किंवा जळजळ होणे, लघवी लहान किंवा रक्तरंजित होणे, पोटात दुखणे आणि ताप येणे. यूटीआयपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही येथे सांगितलेल्या या घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.

आवळा आणि हळदUTI च्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आवळा आणि हळदीचा वापर करू शकता. यासाठी एक चमचा आवळा पावडर आणि एक चमचा हळद मिसळा. हे मिश्रण पावडर एक कप पाण्यात उकळवा. जेव्हा ते अर्धे कमी होईल तेव्हा काही तासांच्या अंतराने दिवसातून चार वेळा प्या.

टी ट्री तेलयूटीआयच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही टी ट्री ऑइलचा वापर करू शकता. या तेलात बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करणारे अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात. या तेलाचे काही थेंब काही पाण्यात मिसळा आणि दिवसातून तीन ते चार वेळा या पाण्याने तुमचा प्रायव्हेट पार्ट धुवा.

ब्लूबेरी आणि क्रॅनबेरीयूटीआयची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही ब्लूबेरी आणि क्रॅनबेरीची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही दररोज अर्धा ग्लास ब्ल्यूबेरी आणि क्रॅनबेरी ज्यूसचे सेवन करावे. याच्या सेवनाने बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते.

अननसUTI पासून आराम मिळवण्यासाठी अननसदेखील मदत करू शकतात. यासाठी रोज एक कप अननसाचे सेवन करावे किंवा त्याचा रस एक ग्लास प्यावा.

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर-लिंबू-मधयूटीआय संसर्गापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर, लिंबू आणि मध वापरू शकता. यासाठी एका ग्लास पाण्यात दोन चमचे अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर घ्या आणि त्यात काही थेंब लिंबाचा रस आणि काही थेंब मध टाकून ते प्या.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स