शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सायनसच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर 'हे' घरगुती उपाय देतील लवकर आराम, वाचा अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 17:07 IST

सायनसच्या इन्फेक्शनपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

सायनस इन्फेक्शन असा आजार आहे, जो कोणत्याही वयात होऊ शकतो. या आजाराचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. हे इन्फेक्शन सर्दी, प्रदूषण आणि अ‍ॅलर्जीमुळे होतं, परंतु त्याचा त्रास झाल्यानंतर शारीरिक तसंच मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं. कारण सायनसचा त्रास असलेल्या रुग्णांना ताप येणं, पापण्यांच्या दोन्ही बाजूंना दुखणं, सूज येणं यासारखी लक्षणं दिसतात, तसंच त्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसू शकतो. सायनसच्या रुग्णांच्या नाकात आणि घशात नेहमीच कफ असतो.

या रुग्णांना धूळ आणि धुराचा सर्वाधिक त्रास होतो. सायनसची समस्या वाढल्यास अस्थमा, दमा यासारखे गंभीर आजार होऊ लागतात, त्यामुळे सायनसच्या इन्फेक्शनपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

अ‍ॅपल सीडर व्हिनेगरस्टाइल क्रेझ डॉट कॉमच्या मते, सायनसच्या संसर्गापासून आराम मिळवण्यासाठी, अ‍ॅपल सीडर व्हिनेगर पाण्यात मिसळून दिवसातून दोनदा प्या किंवा गुळण्या करा. कारण त्यात असलेले अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुणधर्म नाकातील सायनसमधील पीएच संतुलित करतात आणि जमा झालेला कफ काढून टाकतात. तसंच ते प्यायल्याने अ‍ॅलर्जीची लक्षणंही कमी होतात.

तोंडावर खोबरेल तेल लावाखोबरेल तेल वितळवून ते आपल्या तोंडावर 5 मिनिटं माऊथवॉश म्हणून लावा आणि कोमट पाण्याने तोंड धुवा. सायनसच्या समस्येपासून आराम मिळेपर्यंत हे दररोज करा.

मध वापरासायनसच्या इन्फेक्शनदरम्यान नाक आणि घशाला सूज येऊ शकते, ही सूज मधाच्या सेवनाने कमी होते. बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यासाठी मधामध्ये अँटिमायक्रोबायल घटक असतात. दिवसातून दोनदा मध पिणं सायनसच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

डिटॉक्स आंघोळ कराआंघोळ करताना, तुमच्या बाथटबमध्ये कोमट पाणी घ्या, त्यात 1 कप एप्सम मीठ, अर्धा कप बेकिंग सोडा, 6 ते 8 थेंब टी ट्री ऑइल टाका आणि दररोज 15 ते 20 मिनिटे आंघोळ करा. यामध्ये असलेले अँटिबॅक्टेरियल एजंट तुमच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ काढून टाकून तुम्हाला सायनसपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात.

सायनस हा आजार गंभीर आहे, सुरुवातीला साधी सर्दी किंवा अ‍ॅलर्जी समजून त्याकडे दुर्लक्ष करणं कालांतराने महागात पडू शकतं. त्यामुळे तुम्हाला सायनसचा त्रास असेल तर हे घरगुती उपाय करून पाहा. शिवाय तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर लवकरातलवकर डॉक्टरांची भेट घ्या आणि त्यावर उपचार घ्या.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स