शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Kidney Health: मुतखड्यामुळे किडनीमध्ये असह्य वेदना होतायत? 'हे' घरगुती उपाय देतील तात्काळ आराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 09:32 IST

आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोनमुळे होणाऱ्या या पोटदुखीवर (Kidney Stone Stomach Pain) काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला त्रासातून नक्कीच अराम मिळेल.

मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन ही एक सामान्य समस्या आहे. ज्यावर योग्य उपचार केल्यास लवकर अराम मिळू शकतो. शरीरातील खनिजे आणि क्षार जेव्हा छोट्या छोट्या दगडाचे रूप धारण करतात तेव्हा त्याला आपण किडनी स्टोन (Kidney Stone problems) म्हणतो. हे स्टोन सामान्यतः मुगाच्या दाण्याएवढे असतात. परंतु काहीवेळा ते वाटाणापेक्षाही मोठे असू शकतात. शरीरात पाण्याची कमतरता हे किडनी स्टोन होण्याचे मुख्य कारण आहे.

या त्रासाकडे वेळीच लक्ष न दिल्यास हे गंभीर रूप धारण करू शकते. यामुळे पोटात खूप वेदना होतात. ज्या कधी कधी असह्य होतात (Kidney Stone treatment). मात्र आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोनमुळे होणाऱ्या या पोटदुखीवर (Kidney Stone Stomach Pain) काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला त्रासातून नक्कीच अराम मिळेल.

व्हिटॅमिन-डी किंवा कॅल्शियमचा पर्याय दीर्घकाळ घेतल्यास शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते. ज्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो. लठ्ठपणा, शारीरिक हालचाल कमी होणे, उच्च रक्तदाब आणि शरीरातील कॅल्शियमचे शोषण कमी होणे यामुळेदेखील किडनी स्टोन होऊ शकतो. जास्त मीठ किंवा प्रथिनयुक्त पदार्थ जसे की मटण, चिकन, चीज, मासे, अंडी, दूध इत्यादी खाल्ल्यानेही मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.

किडनी स्टोनमुळे होणाऱ्या पोटदुखीवर उपाय (Home Remedies For Kidney Stone Stomach Pain)पानफुटीची वनस्पतीकिडनी स्टोनसाठी पानफुटी वनस्पती खूप उपयुक्त असते. याचा उपयोग कारणेदेखील खूप सोपे आहे. यासाठी दिवसभरात कधीही या झाडाची पाने खा. लवकरात लवकर किडनी स्टोनपासून अराम मिळवण्यासाठी रोज सकाळी उपाशी पोटी याची पानं चावून खा आणि भरपूर पाणी प्या. यामुळे तुम्हाला पोटदुखीपासूनही अराम मिळेल आणि मुतखडा बाहेर पाडण्यासही मदत होईल.

पाणी भरपूर प्याकिडनी स्टोनच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी सरावात जालीम उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे (Drink Lots Of Water). कमी पाणी पिणे हेदेखील किडनी स्टोन होण्यामागचे मुख्य कारण असते. त्यामुळे तुम्ही जितके जास्त पाणी प्याल. तितका तुम्हाला त्रास कमी होईल.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरअ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये (Apple Cider Vinegar) मोठ्या प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असते. जे किडनी स्टोनचे लहान तुकडे करण्याचे काम करते. दोन चमचे व्हिनेगर कोमट पाण्यासोबत घेतल्याने किडनी स्टोनच्या समस्येपासून अराम मिळतो.

ऑलिव्ह ऑइल आणि लिंबूलिंबाचा रस (Lemon Juice Benefits) किडनीमधील स्टोन फोडण्यास मदत करतो आणि ऑलिव्ह ऑइल (Olive Oil Benefits) हे स्टोन बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे आपसूकच पोटदुखीचा त्रास कमी होतो. यासाठी एका ग्लास पाण्यात लिंबू आणि ऑलिव्ह ऑईल टाका. हे मिश्रण प्यायल्यास तुमच्या किडनीतील स्टोन बाहेर पडण्यास मदत होते.

डाळिंबाचा रसडाळिंबाचा रसदेखील (Pomegranate Juice Benefits) किडनी स्टोनच्या समस्येवर खूप प्रभावी असतो. डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशन होत नाही आणि वेदनेपासून खूप आराम मिळतो.

कडुलिंबकडुनिंबाच्या पानांची पावडर बनवा आणि दररोज सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत एक चमचा घ्या. यामुळेही तुम्हाला किडनी स्टोनच्या त्रासापासून अराम मिळतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स