शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांना येत असलेली खाज त्वरित घालवा! फक्त 'हे' घरगुती उपाय ट्राय करा अन् पाहा कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 17:36 IST

याचकाळात हवामानातही मोठा बदल होत असतो. ही वेळ मान्सूनच्या परतण्याची आणि थंडीच्या आगमनाची असते. या काळात डोळ्यांना खाज येणं, जळजळ होणं, अशा समस्यांमध्ये वाढ होते. काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.

माणसाच्या पंचेंद्रियांमध्ये डोळ्यांना विशेष महत्त्व आहे. जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी असलेल्या पाच ज्ञानेंद्रियांमध्ये दृष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या लाइफस्टाईलमध्ये आपल्या डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रामुख्याने स्क्रीन टाइम वाढला किंवा हवेतील प्रदूषण वाढल्यास आपल्या डोळ्यांना जास्त त्रास होतो. हवा प्रदूषणाबद्दल बोलायचं झाल्यास दसरा आणि दिवाळीदरम्यान भारतातील बहुतांश भागांत प्रदूषणाची पातळी लक्षणीयरित्या वाढते. तसंच, याचकाळात हवामानातही मोठा बदल होत असतो. ही वेळ मान्सूनच्या परतण्याची आणि थंडीच्या आगमनाची असते. या काळात डोळ्यांना खाज येणं, जळजळ होणं, अशा समस्यांमध्ये वाढ होते. काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.

दसरा आणि दिवाळीच्या काळात डोळ्यांच्या समस्यांचं प्रमाण अधिक वाढतं, हे अनेक संशोधनांतून समोर आलं आहे. एक प्रकारची अ‍ॅलर्जी असं होण्यामागचं मुख्य कारण असू शकतं. या काळात अनेकांच्या डोळ्यांना खाज सुटते. या समस्येनं त्रस्त असलेले लोक हाताने डोळे चोळतात. परिणामी, समस्या कमी होण्याऐवजी ती आणखी वाढते. खालील घरगुती उपाय करून डोळ्यांची खाज आणि जळजळ कमी करता येऊ शकते.काकडी-काकडी हा पाण्याचा सर्वोत्तम स्रोत आहे. त्यात असलेले अँटिबॅक्टेरियल घटक डोळ्यांतील खाज कमी करू शकतात. डोळ्यांना आराम मिळावा यासाठी काकडीच्या रसाचा वापर करावा लागेल. काकडीचा रस एका भांड्यात घेऊन फ्रीजमध्ये ठेवा. तो थंड झाल्यावर त्यात कापूस भिजवा आणि डोळ्यांवर लावा. दिवसातून किमान दोनदा असं केल्यास दोन दिवसांत तुम्हाला फरक दिसेल.

कॅस्टर ऑईल (एरंडेल)डोळ्यांची खाज दूर करण्यासाठी एरंडेल हा उत्तम पर्याय मानला जातो. त्याचा वापर करण्यासाठी एका भांड्यात तेल घ्या आणि त्यात कापूस भिजवा. तेलात भिजवलेला कापूस डोळ्यांभोवती लावा. डोळ्यांच्या त्वचेजवळ संसर्ग झाल्यासही खाज येऊ शकते. एरंडेल तेलामध्ये असलेले औषधी गुणधर्म ही खाज दूर करतात.

थंड पाणी-डोळ्यांची वारंवार जळजळ होत असेल किंवा खाज येत असेल तर थंड पाण्याचा वापर करावा. तोंडात पाण्याची गुळणी घ्या आणि डोळ्यांवर थंड पाणी शिंपडा. साधारण एक मिनिटभर ही क्रिया करा. नंतर स्वच्छ कपड्यानं डोळे पुसून घ्या. सणासुदीच्या काळात डोळ्यांची जळजळ किंवा खाज वाढल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा थंड पाण्याने डोळे धुवावेत.

वरील तिन्ही उपाय घरच्याघरी सहज करता येतील असे आहेत. या वर्षी दसरा-दिवाळीच्या काळात किंवा इतरही वेळी तुम्हाला डोळ्यांची जळजळ किंवा खाजेची समस्या वाढली तर नक्की याचा वापर करून बघा. हे उपाय करूनही आराम मिळाला नाही तर मात्र, नेत्रतज्ज्ञांची भेट घ्या.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स