शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या दिवशी आणि कोणत्या महिन्यात तरूणांना असतो हार्ट अटॅकचा अधिक धोका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 10:09 IST

बदलत्या जीवनशैलीने लोकांच्या आरोग्यावर फार प्रभाव टाकला आहे. काही आजार असे असतात, जे एका ठराविक वयानंतर होण्याची शक्यता असते.

(Image Credit : livemint.com)

बदलत्या जीवनशैलीने लोकांच्या आरोग्यावर फार प्रभाव टाकला आहे. काही आजार असे असतात, जे एका ठराविक वयानंतर होण्याची शक्यता असते. पण अलिकडे असे आजार तरूणांमध्येही होऊ लागले आहेत. एका रिपोर्टवर विश्वास ठेवायचा तर अलिकडच्या वर्षांमध्ये तरूणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण अधिक वेगाने वाढत आहे. हार्ट अटॅकचा धोका कोणत्याही वयात होऊ शकतो. पण तरूणांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वेगाने वाढत आहे. एका रिसर्चमध्ये, हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. या रिसर्चनुसार, हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका कधी होऊ शकतो, याची माहिती घेऊन हार्ट अटॅकपासून बचाव करता येतो. 

काय सांगतो रिसर्च?

टाइम्स ऑफ इंडियाने एका रिपोर्टबाबत दिलेल्या वृत्तानुसार, हा रिसर्च करण्यासाठी ७ वर्षांचा कालावधी लागला आणि १५, ६०० हॉस्पिटलच्या हार्ट अटॅकच्या रूग्णांच्या डेटाची पाहणी केली. तर रिसर्चमधून अनेक धक्कादायक तथ्य समोर आलेत. रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, लोकांना सोमवारी सर्वात जास्त हार्ट अटॅक येतात. तेच सर्वात कमी हार्ट अटॅकचा धोका शनिवारी असतो. रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, सोमवारी आठवड्यातील इतर दिवसांच्या तुलनेत हार्ट अटॅकचा धोका ११ टक्क्यांनी अधिक असतो. आधी हार्ट अटॅकच्या कारणामुळे झालेला तणाव दुसऱ्या हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतो.

तसेच या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, जे तरूण नोकरी करतात त्यांना सोमवारी हार्ट अटॅकचा धोका सर्वात जास्त राहतो. तसेच असेही सांगण्यात आले आहे की, सोमवारी कामाचा ताण जास्त असतो त्यामुळे असं होतं. जे तरूण नोकरी करतात, त्यांच्यात इतर लोकांच्या तुलनेत सोमवारी २० टक्क्यांनी अधिक हार्ट अटॅकचा धोका राहतो.

कोणता महिना धोकादायक?

हार्ट अटॅकशी संबंधित या रिसर्चमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, डिसेंबर महिन्यात हार्ट अटॅकचा धोका सर्वात जास्त असतो. तेच सर्वात कमी धोका जुलै महिन्यात राहतो. 

तरूणांमध्ये हार्ट अटॅकचं मुख्य कारण

(Image Credit : startupdonut.co.uk)

या रिसर्चमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, कोणतीही व्यक्ती असो पण तणाव जास्त असेल तेव्हा हार्ट अटॅकचा धोका सर्वात जास्त असतो. तणाव किंवा स्ट्रेसमुळे शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात, जे हार्ट अटॅकचा धोका वाढवतात.

बचावासाठी उपाय

हार्ट अटॅकचा धोका तरूणांमध्ये वाढत आहे. हे बघताना तरूणांनी आपल्या खाण्या-पिण्यावर आणि लाइफस्टाईलवर विशेष लक्ष दिलं पाहिजे. हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, जे लाइफस्टाईलमध्ये फॉलो करावेत.  या उपायांमध्ये रोज एक्सरसाइज करणे, तणावा-चिंता कमी करणे, तणाव दूर करण्यासाठी पर्याय शोधणे, आहारातून पोषक तत्वांचं सेवन करणे, अल्कोहोल, सिगारेट किंवा इतर कोणतेही मादक पदार्थांचं सेवन करून नये.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स