शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

शरीरात गपचूप वाढत असलेल्या आजारांचे संकेत देतात पाय, ज्याकडे सगळेच दुर्लक्ष करतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 11:06 IST

Hidden Disease In Body: पायांची त्वचा, नखांचा रंग किंवा आकार यावरून आपल्याला अनेक गंभीर आजारांचे संकेत मिळतात. चला जाणून घेऊ त्या संकेतांबाबत जे  तुमच्या पायांवर दिसतात.

Hidden Disease In Body:  पायांची काळजी घेण्याबाबत आपलं काम केवळ नखं कापण्यापुरतंच असतं. डॉक्टरांचं मत आहे की, शरीरात होणाऱ्या कोणत्याही गडबडीचा प्रभाव सर्वातआधी आपल्या पायांवर दिसतो. कारण आपले पाय हृदय आणि कण्यापासून सर्वात दूर असतात. त्यामुळे पायांची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. पायांची त्वचा, नखांचा रंग किंवा आकार यावरून आपल्याला अनेक गंभीर आजारांचे संकेत मिळतात. चला जाणून घेऊ त्या संकेतांबाबत जे  तुमच्या पायांवर दिसतात.

पाय आणि अंगठ्याचे केस गळणे

जर तुमच्या पायांवरील आणि अंगठ्यावरील केस अचानक गळू लागले असतील तर रक्तप्रवाहात समस्या असल्याचा संकेत मानला जातो. पुरेसा रस्त पुरवठा होत असल्याने पायांवरील केस गळू लागतात. कारण त्यांना पोषण मिळत नाही. हा या गोष्टीचाही संकेत असू शकतो की, तुमचं हृदय रक्त पायापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसं पंप करत नाहीये.

पाय लचकणे किंवा क्रॅम्प

जर तुमचा पाय नेहमीच लचकत असेल किंवा क्रॅम्प येत असेल तर तुमच्या शरीरात डीहायड्रेशन आणि पोषक तत्वांची कमतरता आहे. जर तुम्ही नियमितपणे एक्सरसाइज करत असाल तर जास्तीत जास्त पाणी प्यावे कारण अनेकदा  क्रॅम्प डिहायड्रेशनमुळे येतात. तसेच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. जे तुम्हाला योग्य प्रमाणात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम घेण्याचा सल्ला देतील. जर क्रॅम्प जास्त दिवस राहत असेल तर वेळीच योग्य ते उपचार घ्या. 

ठीक न होणाऱ्या जखमा

बऱ्या न होणाऱ्या जखमा डायबिटीसचा संकेत देतात. रक्ता ग्लूकोजचं अनियंत्रण स्तर पायांच्या नसांना इजा पोहोचवतं. याचा अर्थ हा आहे की, जर जखमा, घाव किंवा पुरळ पायांवर असेल, जर यात इन्फेक्शन झालं तर स्थिती वाईट होऊ शकते. त्यामुळे पायांची काळजी नियमितपणे घ्या. 

पाय थंड राहत असतील तर

असं होत असेल तर हा hypothyroidism चा संकेत आहे. ज्यात तुमचे पाय गरम होत नाहीत. 40 वयानंतर ही समस्या अधिक बघायला मिळते आणि लोक याकडे वातावरणाचा प्रभाव म्हणून अनेकदा दुर्लक्ष करतात. hypothyroidism चे दुसरे नुकसानही आहेत जसे की, केसगळती, थकवा, अचानक वजन वाढणं, कॉन्स्टिपेशन आणि डिप्रेशन. यामुळेच पाय ठंड होण्याची समस्या समोर येताच वेळीच डॉक्टरांना संपर्क करा.

हेही आहेत काही लक्षणं

यासोबतच अंगठा अचानक सूजला असेल किंवा लाल झाला असेल किंवा जॉइंटमध्ये वेदना हे आर्थरायटिसचे संकेत असू शकतात. जर तुमची टाच दुखत असेल तर याचा अर्थ होतो की, तुम्हाला शूज किंवा चप्पल बदलण्याची गरज आहे.

त्वचा रखरखीत होणे किंवा पिवळेपणा येणे

ही फंगल इन्फेक्शनची लक्षणं आहेत. यामुळे पाय जास्तीत जास्त कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. जर फंगल इन्फेक्शन नसेल तर हा एग्जिमाही असू शकतो. पण स्वत: कोणत्या निष्कर्षावर पोहोचण्याआधी डॉक्टरांना संपर्क करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य