शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Diabetes Tips: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी डायबिटीस रुग्णांनी प्या 'हे' खास चहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 16:27 IST

आम्ही तुम्हाला काही हर्बल टीबद्दल सांगणार आहोत, जे इन्सुलिन हार्मोनचे संतुलन योग्य ठेवतेच, पण रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित करू शकते.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये मधुमेह खूप सामान्य आजार झाला आहे. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) नेहमी वाढते जाते. ज्यामुळे रुग्णाला वारंवार शौचाला जाणे, जास्त तहान लागणे आणि भूक लागणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. मधुमेहामुळे (Diabetes) शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही आणि जर ही स्थिती जास्त काळ टिकून राहिली तर रुग्ण इतर अनेक आजारांना बळी पडतो. अशा परिस्थितीत रुग्णाने खाता-पिताना विचारपूर्वक खावे. जर त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर रुग्णाची साखरेची पातळी जास्त होऊ शकते आणि जीवही (Tea For Diabetes) जाऊ शकतो.

मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे फार महत्त्वाचे आहे. कारण रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्याने किडनी निकामी होणे, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. अशा काही गोष्टी आहेत, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी चांगली राहण्यास मदत होते. या लेखात आम्ही तुम्हाला काही हर्बल टीबद्दल सांगणार आहोत, जे इन्सुलिन हार्मोनचे संतुलन योग्य ठेवतेच, पण रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित करू शकते.

ब्लॅक टी (Black Tea)ब्लॅक टी आरोग्यासाठी खूप चांगला आहे. ज्या वनस्पतीपासून काळा चहा बनवला जातो त्यामध्ये अनेक प्रकारची पोषक द्रव्ये आढळतात, ज्यातून काळ्या चहाची निर्मिती होते, ज्यात फ्लेविन्स आणि थेरुबिगिन यांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्ण आपल्या आहारात काळ्या चहाचा समावेश करू शकतात. तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा काळ्या चहाचे सेवन करू शकता.

जास्वंदीचा चहा जास्वंदी चहामध्ये पॉलीफेनॉल, अँटिऑक्सिडंट्स आणि अँथोसायनिन सारखे घटक असतात, जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. जास्वंदी चहाद्वारे, केवळ इंसुलिन हार्मोनचे संतुलनच सुधारले जात नाही, तर रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात ठेवता येते.

दालचिनी चहालोक अन्नाची चव वाढवण्यासाठी दालचिनी वापरतात, पण तुम्हाला माहीत आहे का, की ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. नियमितपणे दालचिनी चहाचे सेवन केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. यासह, दालचिनी चहा हृदयदेखील निरोगी ठेवतो

टॅग्स :Healthआरोग्यdiabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्स