(Image Credit : Pharmaceutical Journal)
४ हजार ते १० हजार रूपयात होणारी हीमोफिलीया टेस्ट आता ५० रूपयांपेक्षाही कमी खर्चात होणार आहे. हीमोफिलीया-ए आणि रक्ताशी संबंधित आजारांची माहिती मिळवण्यासाठी भारतात जगातली सर्वात स्वस्त आणि पहिल्यांदाच रॅपिड डायग्नोस्टिक किट तयार केली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने ही किट तयार केली आहे. आणि याचं पेटेंटही मिळवलं आहे.
स्पेशल पेपरपासून तयार केली किट
एका स्पेशल पेपरपासून ही किट तयार करण्यात आली असून याचा वापर करण्यासाठी ना इन्फ्रास्ट्रक्चरची गरत असते ना स्पेशलिस्टची. देशातील कोणत्याही प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये हीमोफिलीयाची टेस्ट करणे शक्य होऊ शकेल. रक्ताचा थेंब पेपरवर टाकल्यावर १० मिनिटात रिझल्टही मिळेल. एका अंदाजानुसार, देशात हीमोफिलीयाने पीडित रूग्णांची संख्या १ लाखांपेक्षा अधिक आहे.
काय आहे हा आजार?
हीमोफिलीया एक असा आहे, ज्याने रक्त गोठत नाही. या आजारामुळे पीडित रूग्णाची ब्लीडिंग थांबत नाही. म्हणजे शरीरावर एखादी जखम झाली असेल किंवा कापलं असेल तर काही वेळाने त्या जागेवरील रक्त गोठतं. ज्यामुळे ब्लीडिंग थांबतं. पण पण जर त्या व्यक्तीला हीमोफिलीया आजार असेल तर त्याचं ब्लीडिंग थांबत नाही. त्यामुळे या आजाराची माहिती मिळवणं गरजेचं आहे. अनेकदा लोकांना माहितीही नसतं की, ते या आजाराचे शिकार आहेत.
हीमोफिलीयाची लक्षणे
शरीरावर निळे डाग दिसणे, नाकातून रक्त वाहणे, डोळ्यातून रक्त वाहणे हे मुख्य लक्षणे आहेत. या आजाराचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे रक्तस्त्राव. ते अंतर्गत (डोळ्यांना न दिसणारे) किंवा बाह्य असू शकते जे डोळ्यांना दिसून येते. काहीवेळेला कोणत्याही स्पष्ट कारणाविना रक्तस्त्राव होऊ शकतो. हा आजार असलेल्या लोकांना इतरांच्या तुलनेत फार मोठ्या प्रमाणात किंवा वेगाने रक्तस्त्राव होत नाही. उलट, त्यांचा रक्तस्त्राव दिर्घकाळपर्यंत चालू राहतो.