शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उंची अन् हृदयरोगाचा थेट संबंध, संशोधनात दावा; जाणून घ्या उंचीनुसार तुम्हाला कोणते आजार होऊ शकतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 13:35 IST

माणसाची उंची आणि त्याला होणारे आजार यांचा थेट संबंध असल्याचे वैद्यकीय संशोधनातून समोर आले आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध आघाडीच्या संस्थांनी गेल्या काही वर्षात केलेल्या संशोधनानंतर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

माणसाची उंची आणि त्याला होणारे आजार यांचा थेट संबंध असल्याचे वैद्यकीय संशोधनातून समोर आले आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध आघाडीच्या संस्थांनी गेल्या काही वर्षात केलेल्या संशोधनानंतर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

या निष्कर्षा प्रमाणे कमी उंचीच्या व्यक्तींना मधुमेह आणि हृदयविकाराचा जास्त धोका असतो. तसेच या व्यक्तींना कमी वयात टक्कल पडण्याची शक्यताही अधिक असते. तर उंच व्यक्तींना कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते असे या संशोधनात म्हटले आहे. उंच महिलांमध्ये कर्करोगाचा धोका जास्त असू शकतो.

तर कमी उंचीच्या महिलांना गर्भारपणाच्या कालावधीत दिवस पूर्ण होण्यापूर्वीच बाळ जन्माला येण्याची शक्यता अधिक असते. पाच फूट नऊ इंच पेक्षा जास्त उंची असणाऱ्या महिलांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण ३३ टक्के जास्त असते. तर पाच फूट तीन इंच पेक्षा कमी उंची असणाऱ्या व्यक्तींसाठी हृदयरोगाचा धोका ५० टक्क्यांनी वाढतो. गेल्या २० वर्षांच्या कालावधीत करण्यात आलेल्या दोन हजार पेक्षा जास्त संशोधनात उंची आणि हृदयविकार यांचा थेट संबंध असल्याचा निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

जास्त उंची असणाऱ्या लोकांमध्ये ब्लड क्लॉटिंगचे प्रमाण जास्त असू शकते. माणसाच्या उंचीप्रमाणे त्याच्या शरीरातील रक्तवाहिन्या आणि हार्मोन्स यांचे कार्य चालत असल्याने विविध आजारांचे हे परिणाम दिसून येत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये लंडनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, जर्मनीतील वान युनिव्हर्सिटी, ओहियो येथील रिसर्च सेंटर, स्वीडनमधील यूनिवर्सिटी, हॉस्पिटल फिनलंड मधील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी, जर्मनीच्या इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन न्यूट्रिशन या विविध संस्थांनी केलेल्या संशोधनातून हे सर्व निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स