शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

नोकरी करणाऱ्या लोकांनी करू नका या चुका, Heart Attack टाळण्यासाठी करा हे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 13:41 IST

Heart attack : अलिकडे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही हार्ट अटॅकचा सामना करावा लागत आहे.

Heart attack :  नोकरीसोबतच आपल्या आरोग्याची काळजी घेणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. काही लोक ऑफिससोबतच जिम आणि योगासारख्या गोष्टींना आपल्या लाइफस्टाईलचा भाग बनवतात. पण काही लोकांना वेळ मिळत नसल्याने या गोष्टींवर फोकस करणं अवघड असतं. अलिकडे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही हार्ट अटॅकचा सामना करावा लागत आहे.

हृदयरोग जगभरात मृत्यूचं मुख्य कारण आहे. दरवर्षी 17.9 मिलियन लोकांचा मृत्यू याच कारणाने होतो. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एका अभ्यासानुसार, भारतात जवळपास 60 टक्के लोक हृदयरोगाने पीडित आहेत. एक्सपर्टनुसार, नोकरी करणारे लोक काही उपाय करून हृदयरोग टाळू शकतात.

1) कॉफीचं सेवन कमी करा

ऑफिसमध्ये काम करणारे लोक दिवसभर एनर्जी मिळवण्यासाठी कॉफीवर अवलंबून असतात. भलेही कॉफीचं सेवन आरोग्यासाठी चांगलं आहे, पण जास्त कॅफीनचं सेवन हृदयाची गति वाढवतं आणि रक्तदाबही वाढतो. ज्यामुळे घाबरल्यासारखं वाटू शकतं. अशात हार्ट अटॅक येऊ शकतो. अशात बचावासाठी केवळ सकाळीच कॉफीचं सेवन करा.

2) हेल्दी डाएट

ऑफिसमध्ये लागलेल्या वेंडिंग मशीनमधून लगेच काही खाणं सोयीस्कर ठरू शकतं. पण नेहमीच एका पौष्टिक पर्यायाची निवड करणं शरीर आणि हृदयासाठी फायदेशीर ठरतं. कधी कधी अशा वेंडिंग मशीनमधून काही खाणं ठीक आहे. पण आपला उर्जेचा स्तर कायम ठेवण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी पौष्टीक आहारच घ्यावा. 

3) पूर्ण झोप घ्या

जर कुणी कामावर जाण्याआधी पुरेशी झोप घेत नसेल तर त्याना थकवा, चिडचिडपणा आणि कामावर फोकसची कमतरता जाणवते. कमी झोपेमुळे व्यक्तीच्या कामाच्या स्तर प्रभावित होतो, सोबतच त्यांच्या हृदयाच्या आरोग्यावरही प्रभाव पडतो. एका रिसर्चनुसार, कमी झोप घेणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोग विकसित होण्याचा धोका 29 टक्के वाढतो. सतत कमी झोप घेत असाल तर हे घातक ठरू शकतं. याने ब्लड प्रेशर वाढतं आणि हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो.

4) क्रोनिक स्‍ट्रेस कमी करा

सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, स्‍ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचं प्रमाण वाढलेल्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. स्‍ट्रेसमुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि संभावित हृदयरोगाचा धोका वाढतो. जेव्हा एखादी व्यक्ती वृद्ध होते तेव्हा क्रोनिक स्‍ट्रेसही मेमरीला नकारात्मकपणे प्रभावित करते. स्‍ट्रेस कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान साधनेची मदत घ्यावी. 

5) जास्त वेळ बसू नका आणि व्यायाम करा

जास्त वेळ बसून राहिल्याने डीन वेन थ्रोम्बोसिसचा धोका वाढू शकतो. जी एक ब्लड क्लॉट कंडिशन आहे. दिवसभर काम करत असताना उभं राहणे, स्‍ट्रेच करणे किंवा फिरण्यासारखे छोटे छोटे ब्रेक घ्या. यासाठी तुम्ही अलार्म सुद्धा सेट करू शकता.

नोकरी करणारे लोक नेहमीच आपल्या कामांमध्ये अडकतात आणि आपल्या आरोग्याची हवी तशी काळजी घेत नाहीत. पण हे समजून घेणं फार महत्वाचं आहे की, हृदय निरोगी ठेवणारी जीवनशैली तुम्ही कधी अंगीकारू शकता. वर बदल तुम्ही लाइफस्टाईलमध्ये केले पाहिजे. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स