शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

पुरूषांपेक्षा महिलांमध्ये वेगळी असतात हार्ट फेल्युअरची लक्षणं, जाणून घ्या कोणती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 13:31 IST

या लक्षणांचे निदान होईपर्यंत इतर अनेक आजारांच्या महिला शिकार झालेल्या असतात.

आरोग्य तज्ञांच्यामते महिला आणि पुरूष यांच्या शरीरातील बदलामुळे त्यांना उद्भवणारे आजार सुद्धा वेगळे असतात.  ही बाब हृदयाच्या आजाराशी निगडीत लागू होते.  अनेकदा या आजारांच्या लक्षणांना ओळखणं सुद्धा कठीण होऊन बसतं.हार्ट फेल्युअरच्या आजारात पुरूषांच्या तुलनेत महिलांना खूप वेगळी लक्षणं दिसत असतात. परिणामी या लक्षणांचे निदान होईपर्यंत इतर अनेक आजारांच्या महिला शिकार झालेल्या असतात.‘हार्ट फेल्युअर’  ही एक गंभीर समस्या असून वेळेत निदान आणि उपचार झाल्यास धोका कमी होतो.

हार्ट फेल्युअरची कारणं

हार्ट अ‍ॅटक 

उच्च रक्तदाब

कार्डिओमायोपथी

फुफ्फुसांचा आजार

डायबिटीस

लठ्ठपणा

मादक पदार्थांचे सेवन

या कारणांमुळे श्वसनविषयक आजारदेखिल होऊ शकतात.पण महिलांध्ये या आजाराचं स्वरूप वेगळं दिसून येतं. साधारणपणे ४० वयानंतर मेनोपॉजच्या वेळी महिलांना हार्ट फेल्युअरची समस्या जाणवते. सोबतच वजन वाढतं. हातापायांना सुज येते, सांधेदुखीच्या वेदना होतात. महिलांमधील हार्मोन एस्ट्रोजन आणि पुरूषांमधील हार्मोन टेस्टोस्टेरॉन यांच्या असंतुलनामुळे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. म्हणून अचानक वजन वाढल्यास  किंवा वजन कमी- जास्त होतं तेव्हा बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. (हे पण वाचा-Corona virus : ट्रेन आणि बसच्या प्रवासामुळे होऊ शकता कोरोनाचे शिकार, 'अशी' घ्या काळजी....)

हार्ट फेल्युअरने त्रस्त रुग्णांमध्ये हृदयातील स्नायू कमकुवत होत जात असल्यामुळे रक्‍ताचे प्रवाह शरीरात योग्यरित्या होत नाही. यामुळे नेहमीची कामे करताना सतत थकल्यासारखे वाटू शकते. हार्ट फेल्युअरसारख्या आजारावर वेळेवर निदानासह प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येऊ शकते. (हे पण वाचा-Corona virus : 'या' उपायांनी फोनमुळे होणाऱ्या बॅक्टेरीअल आणि व्हायरल इन्फेक्शनचा टळेल धोका) 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स