शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर देतं संकेत, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो जीवाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 19:17 IST

Heart Attack : आपले शरीर हृदयविकार येण्याआधी काही संकेत देतं, या संकेतांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

Heart Attack : हृदयविकाराची (Heart Attack) लक्षणे ओळखण्यात हलगर्जीपणा किंवा वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यामुळे जीव जाण्याचा धोका आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हृदयाशी संबंधित आजारांबद्दल जागरुकता निर्माण केली जात आहे. सध्या अशा अनेक अ‍ॅडव्हान्स टेस्ट उपलब्ध आहेत, ज्याद्वारे वेळेत हृदयाच्या स्थितीबाबत माहिती मिळू शकते.

एवढेच नाही, तर आपले शरीरसुद्धा हृदयविकार येण्याआधी काही संकेत देतं. या संकेतांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाहीत. अनेक वेळा सामान्य वाटणारी ही लक्षणे हृदयविकाराची पूर्वसूचना असू शकतात. डॉक्टरांचे म्हणणं आहे की, काही वेळा हृदयविकार येण्याच्या महिनाभर आधीपासूनच काही लक्षणे दिसू लागतात.

डॉ. संजीव (चेअरमन, कार्डियोलॉजी विभाग, मारेंगो एशिया हॉस्पिटल, गुरुग्राम) यांच्या मते, एक सामान्य माणूसही शरीराकडून मिळणाऱ्या संकेतांवरुन समजू शकतो की, हृदयावर संकट आहे. 

महिनाभर आधी दिसणारी लक्षणेकाम करताना थकवा जाणवणे, थोडेसे काम केल्यावर दम लागणे, जबड्यात किंवा छातीत सौम्य वेदना होणे...ही लक्षणे हृदयविकार येण्यापूर्वीची असू शकतात. ही लक्षणे जर व्यायाम किंवा मेहनतीच्या वेळी वाढत असतील आणि विश्रांती घेतल्यावर कमी होत असतील, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

शरीराचे महत्त्वाचे संकेतजर कसलाही मोठा शारीरिक परिश्रम न करताही थकवा वाटत असेल, अगदी छोट्या कामात दम लागत असेल, छातीत जळजळ किंवा जडपणा वाटत असेल, तर ही लक्षणे 'गॅस' किंवा 'अ‍ॅसिडिटी' समजून दुर्लक्ष करू नका. विशेषतः, एखादी हालचाल किंवा क्रिया केल्यावर लक्षणे वाढत असतील आणि विश्रांती घेतल्यावर ती कमी होत असतील, तर ती हृदयविकाराची सुरुवात समजावी.

हृदयविकाराची इतर लक्षणे

चालताना किंवा पायऱ्या चढताना छातीत दुखणे, छातीत जळजळ, दम लागणे, थकवा, जबड्यात, खांद्यात वेदना, ...ही लक्षणे जर श्रम करताना दिसत असतील आणि विश्रांतीनंतर लगेच बरी होत असतील, तर ही लक्षवेधी बाब आहे. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, अन्यथा जीव धोक्यात येऊ शकतो.

हृदयविकाराचे कारणे आणि बचावाचे उपाय

हृदयविकाराचे मुख्य कारणे :

  • सिगारेट / तंबाखूचे सेवन
  • जास्त कोलेस्ट्रॉल
  • मधुमेह 
  • उच्च रक्तदाब 
  • तणाव 
  • निष्क्रीय / अस्वस्थ जीवनशैली

बचावाचे उपाय :

  • नियमित तपासणी
  • संतुलित आहार
  • व्यायाम
  • पुरेशी झोप
  • धूम्रपान व तंबाखू टाळणे
  • स्ट्रेस मॅनेजमेंट

या सवयी अंगिकारल्यास हृदयविकाराचा धोका कमी करता येतो.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHealth Tipsहेल्थ टिप्स