शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 17:29 IST

जेवतानाचे काही नियम देखील आहेत. त्याचं पालन केल्यास अन्न नीट पचण्यास नक्कीच मदत होते. त्या नियमांबद्दल जाणून घेऊया....

आजकाल धकाधकीच्या जीवनात आयुष्याकडे थोडं दुर्लक्ष होतं. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि सुस्त जीवनशैलीमुळे लोकांना गॅस, अ‍ॅसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या होतात. ज्यामुळे इतरही अनेक आजारांचा सामना करावा लागतो. जास्तीत जास्त आजार हे पोटापासूनच सुरू होतात असं म्हटलं जातं. 

जर तुमची पचनक्रिया चांगली नसेल किंवा पोट खराब असेल तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी सतत औषधांचा वापर करणंही आरोग्यासाठी चांगलं नसतं. यासाठी काही घरगुती उपायही बेस्ट ठरतात. तसेच जेवतानाचे काही नियम देखील आहेत. त्याचं पालन केल्यास अन्न नीट पचण्यास नक्कीच मदत होते. त्या नियमांबद्दल जाणून घेऊया....

नियम 1 - जेव्हा भूक लागते तेव्हाच आपण अन्न खाल्लं पाहिजे आणि जेवढी भूक लागते तेवढंच अन्न आपण खाल्लं पाहिजे. जेव्हा आपल्याला कडकडून भूक लागते. तेव्हा आपल्या पोटामधला जाठरागणी प्रदिप्त असतो. त्यामुळे खाल्लेलं अन्न हे उत्तमरित्या पचलं जातं. 

नियम 2 - प्रत्येक घास खात असताना आवडीने, मनापासून, चवीचवीने चावून चावून आणि वास घेत घेत खाल्ला पाहिजे. चावून चावून खा हे आपलं ऐकलं आहे पण वास घेत घेत खा असं सांगितलं कारण जेव्हा आपण डोळ्यांनी अन्नाला पाहतो किंवा नाकाने वास घेतो, तेव्हा त्याचे सिग्नल्स आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचतात. पुन्हा ते सिग्नल्स आपल्या इनटेस्टाईन आणि लिव्हरपर्यंत पोहोचतात. जेणकरून जे पाचक रस सेक्रिट होत असतात, ज्यामुळे अन्नाचं पचन होतं, ते उत्तमरित्या सेक्रिट होतील आणि जास्त प्रमाणात सेक्रिट होतील, म्हणून हे नीट लक्षात ठेवा.

नियम 3 - जेवण जेवत असताना पाणी पिऊ नका. पण जर एखादा घास जड जातोय, एखादा घास आपल्याला तिखट लागतोय आणि पाण्याची आपल्याला खूप आवश्यकता भासतेय तर तुम्ही एक घोट पाणी पिऊ शकता. पण शक्यतो जेवण जेवत असताना पाणी पिऊ नका. साधारण तासाभराने तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी पिऊ शकता. याने जाठरसही चांगले सेक्रिट होतात आणि पचनही खूप चांगल्या प्रमाणात होतं. सुहासिनी योग या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून माहिती देणारा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य