धक्कादायक! कोरोना लशीमुळे मानवाला धोका असल्याचे वाटल्याने आरोग्य सेवकाने नष्ट केले 500हून अधिक डोस; अन्...
By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 6, 2021 13:40 IST2021-01-06T13:37:37+5:302021-01-06T13:40:24+5:30
मेडिकल सेंटरने दावा केला आहे, की बँडबर्ग यांच्या कृत्यामुळे आपल्याला या लशीचे 500हून अधिक डोस फेकून द्यावे लागले. यामुळे त्यांना 8100 पाउंड्स म्हणजेच जवळपास 8 लाख रुपयांचे नुकसान झाले.

धक्कादायक! कोरोना लशीमुळे मानवाला धोका असल्याचे वाटल्याने आरोग्य सेवकाने नष्ट केले 500हून अधिक डोस; अन्...
वॉशिंग्टन - कोरोना लशीमुळे लोकांच्या डिएनएमध्ये बदल होईल, असा धोका वाटल्याने अमेरिकेतील एका रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य सेवकाने तब्बल 500 कोरोना लशी नष्ट केल्याची घटना घडली आहे. स्टिव्हन ब्रँडबर्ग (46) असे या आरोग्य सेवकाचे नाव आहे.
ब्रँडबर्ग विस्कॉनसिन येथील ओरोरा मेडिकल सेंटरमध्ये काम करतात. या व्यक्तीने मॉर्डेनाच्या कोरोना लसीचे डोस फ्रिजमधून काढून संपूर्ण रात्र बाहेर ठेवले होते. यामुळे हे डोस खराब झाले. आपण, असे कृत्य जाणून बुजून केल्याचेही ब्रँडबर्ग यांनी मान्य केले आहे. तसेच या घटनेनंतर ब्रँडबर्ग यांना नोकरीवरूनही काढण्यात आले आहे. ही लस सुरक्षित नसल्याचे तसेच यामुळे मानवाच्या डीएनएमध्ये बदल होऊ शकतो, असे वाटल्याने आपण ही लस खराब करण्याचा प्रयत्न केला, असे ब्रँडबर्ग यांनी चोकशीदरम्यान अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
यासंदर्भात बोलताना मेडिकल सेंटरने दावा केला आहे, की बँडबर्ग यांच्या कृत्यामुळे आपल्याला या लशीचे 500हून अधिक डोस फेकून द्यावे लागले. यामुळे त्यांना 8100 पाउंड्स म्हणजेच जवळपास 8 लाख रुपयांचे नुकसान झाले.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मॉर्डेना लस 94.5 टक्के प्रभावी आहे. तसेच ही अत्यंत प्रभावी लस म्हणून वापरली जात आहे. एवढेच नाही, तर यूके सरकारने आतापर्यंत या लशीच्या 7 मिलियन डोसची ऑर्डरही दिली आहे. याशिवाय यूकेने फायझर आणि एस्ट्राजेनेकाच्या लशींनाही मंजुरी दिले आहे. तसेच मॉर्डेना लशीला अद्याप लायसन मिळालेले नाही.