व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे ८० % लोक साथीच्या आजारांना पडताहेत बळी; वेळीच आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

By manali.bagul | Published: November 10, 2020 11:48 AM2020-11-10T11:48:41+5:302020-11-10T11:57:01+5:30

Health Tips in Marathi : व्हिटामीन डी मुळे शरीरातील हाडं आणि दात निरोगी राहण्यासाठी मदत होते. याव्यतिरिक्त व्हिटामीन डी टाईप १ डायबिटीससारख्या आजारांना लांब ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

Health Tips : Vitamin d deficiency linked to coronavirus add these foods to your diet | व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे ८० % लोक साथीच्या आजारांना पडताहेत बळी; वेळीच आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे ८० % लोक साथीच्या आजारांना पडताहेत बळी; वेळीच आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

Next

व्हिटामीन डी माणसाच्या शरीराची वाढ  होण्यासाठी आवश्यक असते. व्हिटामीन डी  शरीरात सुर्याच्या संपर्कात आल्यामुळे तयार होते. याशिवाय सप्लिमेंट्ससह आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही व्हिटामीन डी मिळवू शकता. व्हिटामीन डी मुळे शरीरातील हाडं आणि दात निरोगी राहण्यासाठी मदत होते. याव्यतिरिक्त व्हिटामीन डी टाईप १ डायबिटीससारख्या आजारांना लांब ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. व्हिटामीन्स शरीरात पुरेश्या प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे बाहेरील घटक किंवा आहाराच्या माध्यमातून शरीरात त्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं. आज आम्ही तुम्हाला व्हिटामीन डी मिळवण्यसाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. याबाबत सांगणार आहोत. 

व्हिटामिन डी शरीरातील रोगांशी लढायला मदत करते. फ्लूपासून हृदयरोगासारख्या गंभीर आजारापासून लांब राहता येतं . आपण नैराश्याने ग्रस्त असल्यास व्हिटॅमिन डी घेणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. व्हिटामीन डी एक डायटरी व्हिटामीन आहे. जे नैसर्गिकरित्या अनेक पदार्थांमध्ये असतं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डाइटरी सप्लीमेंट्स (NIH)च्या मते मासे, अंडी, चीज अशा पदार्थांमध्ये व्हिटामीन डी चं प्रमाण जास्त असतं. व्हिटामीनच्या कमतरेमुळे ताप येणं, थकवा येणं, हाडं आणि पाठीत वेदना, मानसिक ताण, केस गळणं, मासंपेशीतील वेदना अशी लक्षणं जाणवतात. याशिवाय हृदयाचे ठोके वाढणं अशाही समस्या उद्भवतात. 

..म्हणून भारतात सर्वाधिक किशोरवयीन मुलांची उंची राहते कमी, अभ्यासातून समोर आला असा निष्कर्ष

हाडांना मजबूती देण्यासाठी , सूज कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी व्हिटामीन डी गुणकारक ठरतं. मेडिकल जर्नल The BMJ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका माहितीनुसार ११ हजार ३२१ लोक प्रत्येक दिवशी व्हिटामीन डी च्या सप्लिमेंट्स घेत होते.अमेरिकन तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वयस्कर व्यक्तीने दिवसात १५ mg व्हिटामिन डी आणि महिलांनी ७५ mg व्हिटामीन घेण्याचा प्रयत्न करायला हवा. तर पुरूषांनी एका दिवसाला 90 mg व्हिटामीन्स घ्यायला हवेत. कोणतीही सप्लिमेंट्स घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

कसं मिळवाल व्हिटामीन डी

पनीर अनेकांना खायला खूप आवडतं. त्यात व्हिटामीन डी मोठ्या प्रमाणावर असते तर नियमीत पनीरचं सेवन केल्यास शरीरातील व्हिटामीन डी ची कमतराता भरून काढण्यास मदत होईल.  दुधापेक्षा दही पचण्यास हलके असते. दह्याच्या सेवनाने पचनाशी निगडीत समस्या दूर होऊन शरीरातील व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण होते. सोयामिल्कच्या सेवनाने शरीला व्हिटामीन डी मिळतं. याशिवाय यात अनेक पोषक घटक असतात. सोयामिल्कमध्ये आयर्न, प्रोटीन्स मोठ्या प्रमाणावर असतात.

चिंताजनक! 'या' देशात आढळलं कोरोनाचं नवं रूप; लसही निरोपयोगी ठरणार, तज्ज्ञांचा इशारा

संत्री, स्टॉबेरी, ब्रोकोली, टॉमॅटो या पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटामीन डी असते. एका संशोधनानुसार सर्दी, खोकला असूनही व्हिटामीन्सच्या टॅबलेट्स घेत असलेल्यामध्ये व्हायरल संक्रमणाचा धोका कमी दिसून आला. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी व्हिटामीन सी आणि व्हिटामीन डी च्या टॅब्लेट्स घ्यायला हव्यात. पण त्या आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

Web Title: Health Tips : Vitamin d deficiency linked to coronavirus add these foods to your diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.