शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी झोपेतून उठल्यावर कराल या चुका तर दिवस जाईल खराब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 17:35 IST

Morning Habits to Change : काही लोक सकाळी लवकर उठून योगा करतात, काही फिरायला जातात तर काही लोक जिमला जातात. आरोग्य चांगलं रहावं हा त्यामागचा उद्देश असतो.

Morning Habits to Change : तुमची सकाळ कशी होते यावर तुमचा पूर्ण दिवस अवलंबून असतो. तसेच सकाळच्या अनेक चुकांमुळे आरोग्यही बिघडतं. त्यामुळे सकाळी काय करावे आणि काय करू नये याबाबत डॉक्टर किंवा घरातील मोठे लोक नेहमीच सांगत असतात.

काही लोक सकाळी लवकर उठून योगा करतात, काही फिरायला जातात तर काही लोक जिमला जातात. आरोग्य चांगलं रहावं हा त्यामागचा उद्देश असतो. अशात आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही सकाळी टाळल्या तर तुमचं आरोग्यही चांललं राहील आणि तुमचा दिवसही चांगला जाईल.

काय टाळावे

तंबाखू, मावा खाणे - अनेकांना स्मोकिंगसारखीच झोपेतून उठल्या उठल्या तंबाखू किंवा मावा खाण्याची सवय असते. अनेकजण टॉयलेटला जाण्याआधी तंबाखू खातात. या गोष्टी आरोग्यास फार धोकादायक आहेत. त्यामुळे सकाळ असो किंवा दिवसा कधीही या गोष्टी टाळणे गरजेचे आहे.

स्मोकिंग - स्मोकिंग करणे आरोग्यासाठी नुकसानदायक आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण काही लोकांना झोपेतून उठल्या उठल्या स्मोक करण्याची सवय असते. हे आणखी जास्त धोकादायक ठरू शकतं. याने कर्करोग होण्याची शक्यता अधिक वाढते.

अल्कोहोल - सकाळी अल्कोहोलचं सेवन केल्याने अनेक शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं. अशाने वाढत्या वयात होणार्‍या व्याधी आणि रोग आधीच शरीरात घर करू लागतात.

वाद - सकाळी घरातील लोकांशी किंवा कुणाशीही भांडण किंवा वाद केल्याने आपला मूड आणि दिवस दोन्ही खराब होतात. आपला मूड चांगला नसला तर त्याचा परिणाम आपल्यासोबत राहणार्‍यावर पडेल, आपल्या कामावर पडेल आणि ताण येईल.

मसालेदार पदार्थ - सकाळचा आहार पौष्टिक असला पाहिजे. मसालेदार, चमचमीत आहाराने पोटात जळजळ होते आणि पचन‍क्रिया बिघडते. मग दिवसभर अस्वस्थ वाटत राहतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य