शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Health Tips: पोटाचे विकार? आलं लिंबू पाचक घरच्या घरी बनवा आणि रोज एक चमचा पाचक रस घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 14:37 IST

Health Tips: ऋतू कोणताही असो पोटाचे विकार उद्भवण्यासाठी कोणतेही कारण पुरते; त्यावर स्वस्त आणि मस्त तोडगा!

छोट्या मोठ्या शारीरिक व्याधींवर उठ सूट महागडी औषधे घेणाऱ्या आजच्या पिढीचा आयुर्वेदाकडे आणि आजीच्या बटव्याकडे कल वाढताना दिसत आहे. कारण रोगराई दरदिवशी वेगवेगळे रूप धारण करत आहे. अशा वेळी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हे जास्त इष्ट ठरते. आले लिंबू पाचक पोटाच्या तक्रारींवर रामबाण उपाय आहे. आल्याचे. लिंबाचे गुण पचनक्रिया सुधारतात शिवाय तापात तोंडाची गेलेली चवसुद्धा परत आणतात. 

बाजारात आले लिंबू पाचक विकत मिळते. काही ठिकाणी ते दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यावर प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे त्याचे फायदे होण्याऐवजी तोटे जास्त होतात. अशा वेळी चांगल्या प्रतीचे उत्पादन घ्यावे किंवा घरच्या घरी बनवावे. हे पाचक बनवणे अतिशय सोपे आहे. एकदा करून ठेवले की महिना भर सहज टिकते. हे पाचक अधिक प्रमाणात घेऊन चालत नाही. कारण अतिप्रमाणात घेतल्याने शरीराचा दाह होऊ शकतो. अतिसार होऊ शकते. म्हणून  सकाळी चहा घेण्याच्या अर्धा तास अंशपोटी एक चमचा रस पाण्यात टाकून घ्याव. आता हे पाचक कसे बनवायचे त्याची पद्धत जाणून घेऊ!

आले लिंबू पाचक

साहित्य :

२०० ते २५० ग्रॅम आले, ६-७ रसरशीत मोठ्ठाली लिंबं, एक चमचा सैंधव (शेंदेलोण) मीठ, अर्धा चमचा हिंग.

  • कृती:  आलं स्वच्छ धुवून व वाळवून घ्या. (सगळी माती निघण्यासाठी पाण्यात तासभर भिजत ठेवावं) 
  • आल्याच्या चकत्या/ काचऱ्या करून मिक्सरवर पेस्ट करून घ्यावी. 
  • पाणी अजिबात घालू नये. 
  • आल्याच्या पेस्टचा रस करून गाळून घ्यावा. 
  • लिंबं धुवून, पुसून रस काढावा. 
  • आल्याचा आणि लिंबाचा रस एकत्र करावा. 
  • त्यात शेंदेलोण आणि हिंग घालून मिक्स करावे. 
  • चव बघून लागल्यास मीठ घालावे. 
  • हे तयार पाचक फ्रीजमधे महिनाभर टिकते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सSummer Specialसमर स्पेशल