शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रात्री पुन्हा पुन्हा झोप मोड होते का? झोपण्याआधी करू नका या चुका; येईल चांगली गाढ झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 11:43 IST

Tips For Proper Sleep : रात्री झोपण्यापूर्वी अनेकजण चॉकलेट, कॉफी किंवा कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खातात. ज्यामुळे तुमची झोप प्रभावित होते. चला जाणून घेऊ चांगल्या झोपेसाठी काय करावं आणि काय करू नये.

Tips For Proper Sleep : रात्री लवकर झोप येत नसले किंवा झोपल्यावर झोप मधे मधे मोडत असेल तर अर्थातच सकाळी तुम्हाला फ्रेश वाटणार नाही. रात्री लवकर झोप न येणे किंवा झोप मधे मधे उघडणे ही समस्या अनेकांना होते. याचा प्रभाव आपल्या आरोग्यावर पडतो. पण रात्री झोप पुन्हा पुन्हा का मोडते याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर याचं उत्तर आहे तुमचं खाणं-पिणं.

रात्री तुम्ही काय खाता यावर तुमची झोप अवलंबून असते. रात्री झोपण्यापूर्वी अनेकजण चॉकलेट, कॉफी किंवा कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खातात. ज्यामुळे तुमची झोप प्रभावित होते. चला जाणून घेऊ चांगल्या झोपेसाठी काय करावं आणि काय करू नये.

झोपण्याआधी कॅफीनचं सेवन करू नये

वेगवेगळ्या रिसर्चनुसार, सर्वातआधी तर तुम्ही झोपण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव डोक्यातून काढून टाका. त्यानंतर झोपण्याच्या २ ते ३ तासांआधी कॅफीनचं सेवन करू नका. कारण कॅफीनमध्ये असे तत्व असतात ज्याने झोप येत नाही. ज्याने आपल्या मेंदू झोपण्याऐवजी सक्रिय होतो. 

कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ टाळा

कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ आपल्या झोपेत अडथळा निर्माण करतात. तसे तर एका योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेटने आपल्या झोपेला काही अडचण नाही. पण जास्त प्रमाणात याचं सेवन केलं तर मेटाबॉलिज्म प्रभावित होतं. ज्यामुळे आपली झोप प्रभावित होते.  यादरम्यान आपल्याला अस्वस्थता जाणवते. त्यामुळे प्रयत्न हाच करा की, झोपण्याआधी जास्त कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ जसे की, भात, पास्ता, चिप्स, केळी, सफरचंद, बटाटे किंवा काही धान्य ज्यात कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतं हे पदार्थ टाळा.

रात्री काय खाऊ नये

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जास्त प्रोटीन असलेला आहार जसे की, मांस किंवा डाळी किंवा मासे, अंडी याचही झोपण्याआधी सेवन केलं तर तुमची झोप प्रभावित होते. असं मानलं जातं की, याने तुमच्या पचन तंत्रावर दबाव पडतो आणि पचनक्रिया हळूवार होते. त्यामुळे याचंही सेवन रात्री करू नये.

रात्री चॉकलेट खाऊ नका

सामान्यपणे सर्वांनाच माहीत आहे की, रात्री चॉकलेट खाणं आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. याने तुमचे दात खराब होता आणि याने तुमच्या झोपेतही अडथळा निर्माण होतो. काही लोक चॉकलेटचं सेवन जेवणानंतर स्वीट म्हणून करतात. तर चहा आणि कॉफी सारखंच चॉकलेटमध्येही कॅफीन प्रमाण अधिक आढळतं. याने तुमचा मेंदू सक्रिय राहतो आणि त्यामुळे तुम्हाला झोप येत नाही. इतकंच नाही तर तुमची झोप मोडते. त्यामुळे रात्री चॉकलेट खाणं टाळलं पाहिजे. या टिप्स फॉलो कराल तर तुम्ही चांगली झोप घेऊ शकता.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य