शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
2
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
3
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
4
आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
5
ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना
6
Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?
7
'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
8
आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
9
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 
10
१ नोव्हेंबरपासून बदलणार नियम! आता बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार एकापेक्षा अधिक 'वारस'दार, जाणून घ्या
11
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
12
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
13
दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे
15
'या' आयपीओचं बंपर लिस्टिंग! पहिल्याच दिवशी ९ टक्क्यांचा नफा, गुंतवणूकदार मालामाल
16
Budh Gochar 2025: २४ ऑक्टोबर बुध गोचर; १० नोव्हेंबरपर्यंत 'वृश्चिक' राशीच्या लोकांनी घ्या 'ही' काळजी!
17
हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! बसच्या भीषण आगीत कुटुंब संपलं; आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू
18
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
19
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
20
अ‍ॅपलने उचललं मोठं पाऊल; स्टोअरमधून काढून टाकले 'हे' व्हायरल डेटिंग अ‍ॅप! काय आहे कारण?

वाढत्या कोरोनाच्या प्रसारात तुम्हालाही सर्दी, खोकला होण्याची भीती वाटते? 'अशी' घ्या काळजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 09:40 IST

लॉकडाऊनमध्ये सतत घरी बसल्यानं व्हिटामीन डी च्या कमतरतेनं अनेकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली आहे. असं एका रिसर्चमधून स्पष्ट झालं आहे.

दरवर्षी  वातावरणातील बदलांमुळे म्हणजेच पावसाळा ते हिवाळा, हिवाळ्यानंतर उन्हाळा या कालावधीत आरोग्यावर परिणाम  होऊन वेगवेगळ्या समस्या उद्भवतात.  सध्या कोरोनाची माहामारी असल्यामुळे आजारी पडण्याची भीती लोकांच्या मनात आहे. ताप, सर्दी किंवा खोकला ही  कोरोना संसर्ग झाल्याची सुरूवातीची लक्षणं आहेत.  लॉकडाऊनमध्ये सतत घरी बसल्यानं व्हिटामीन डी च्या कमतरतेनं अनेकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली आहे. असं एका रिसर्चमधून स्पष्ट झालं आहे.

कोणत्याही आजारांची धास्ती न घेता घरगुती उपाय करून तुम्ही या आजारांपासून स्वतःला लांब ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला सर्दी, खोकल्यापासून दूर राहण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांनी तुम्ही स्वतःला नेहमी निरोगी ठेवू शकता.  कारण  खोकल्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या आजारात रुपांतर होऊ शकतं. म्हणून आजारांवर वेळीच उपचार केल्यास आरोग्याला धोका उद्भवणार नाही. 

मध

नियमित दोन चमचे मध खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. मधामध्ये अॅन्टी मायक्रोव्हियल गुण असल्यानं यामुळे संसर्ग पसरवणाऱ्या जिवाणूंचाही खात्मा होतो.  तुम्ही दूधात मध घालूनही सेवन करू शकता. मधामध्ये मुबलक प्रमाणात अ‍ॅन्टी-बॅक्टेरियल, अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि अ‍ॅन्टी-फंगल गुणधर्म असतात आणि दूधामध्ये कॅल्शिअम असतं. त्याचबरोबर दूधामध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि डी, प्रोटीन आणि लॅक्टिक अ‍ॅसिडदेखील मुबलक प्रमाणात असतं. जे शरीराला कॅल्शिअमची कमतरता भासू देत नाहीत. हाडं आणि दातांच्या मजबुतीसाठी हे फायदेशीर ठरतं. 

काळी मिरी

खोकल्याचा त्रास होत असल्यास काळी मिरी आणि खडीसाखर योग्य प्रमाणात वाटून घ्या. त्यामध्ये तूप घालून त्याच्या लहान गोळ्या बनवा. दिवसातून ३ ते ४ वेळा गोळी चोखल्यास, तुमचा कफ असलेला खोकला निघून जाण्यास मदत होईल.

हळद

हळदीच्या दूधाचे अनेक फायदे आहेत. असं म्हटलं जातं की, यामुळे सर्दी, खोकला आणि जखम लगेच भरून निघते. एवढचं नाहीतर शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं.  दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास जास्त जाणवतो अशा लोकांनी हळदीच्या दुधाचं सेवन करणं गरजेचं आहे.

सर्दी, खोकला आणि घशात होत असलेल्या खवखवीसाठी हळदीचं दूध उत्तम ठरत असतं. रोज रात्री झोपण्याआधी हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने शरीर चांगले राहते. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतो. तसेच रक्त अधिक पातळ करण्यास मदत करते. शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो.

तुळस

तुळशीची पानं, आलं आणि जेष्ठमध बारिक करून त्यामध्ये मध एकत्र करून खा. त्यामुळे ताप, डोकेदुखी, घशात होणारी खवखव, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या दूर होतात. तुळशीच्या पानांच्या अर्कात मध एकत्र करून प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होते. त्याचबरोबर क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, अस्थमा यांसारख्या श्वासाशी निगडीत आजारांवरही फायदेशीर ठरतो.

सगळ्यात आधी दिड ग्लास दूध उकळून घ्या उकळलेल्या दुधात ८ ते १० तुळशीची पानं घाला. हवं तर तुम्ही या दुधात हळद किंवा मध घालू  शकता. दूध पूर्णपणे उकळल्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर या दुधाचे सेवन करा. तुळशीच्या दुधाच्या सेवनाने मायग्रेनची किंवा खोकल्याची  समस्या दूर होते. 

हे पण वाचा-

CoronaVirus: हिवाळ्यात कोरोना हाहाकार माजवणार, मृत्यूचे प्रमाणही वाढेल, WHOचा गंभीर इशारा

काळजी वाढली! कोविड १९ च्या लक्षणांबाबत WHO नं दिली सूचना; जाणून घ्या काय म्हणाले तज्ज्ञ

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या