शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पोटावरील सूज कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय, लगेच मिळेल आराम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 11:10 IST

पोटातील सूज दूर करायची असेल तर तुम्हाला तुमच्या लाइफस्टाइलमध्ये बदल करावा लागेल. काही घरगुती उपायांनी देखील तुम्ही हे करू शकता.

अनेकदा काही लोकांचं पोट फार जास्त फुगलेलं दिसतं. पोट फुगण्याची वेगवेगळे कारणे आहेत. पण त्यातील एक कारण म्हणजे पोटात सूज येणं हे आहे. जेव्हा पोटात गॅस तयार होतो तेव्हा पोटात सूज येण्याची समस्या वाढू लागते. तर अनेकदा पोटात सूज चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे, मासिक पाळीमुळेही येते. याकडे जर जास्त दिवस दुर्लक्ष केलं तर पोट फुगू शकतं. सोबतच पाठदुखी, पोटदुखी या समस्या होऊ लागतात. पोटातील सूज दूर करायची असेल तर तुम्हाला तुमच्या लाइफस्टाईलमध्ये बदल करावा लागेल. काही घरगुती उपायांनी देखील तुम्ही हे करू शकता.

घाई-घाईने खाऊ नका

जर तुम्हाला घाई-घाईने खाण्याची सवय असेल तर ही सवय लवकरात लवकर बदलायला हवी. कारण जेव्हा तुम्ही घाईने काही खाता तेव्हा पोटात अन्नासोबतच हवाही जाते. ज्यामुळे पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे जेव्हाही काही खाल तेव्हा हळूहळू आणि शांतपणे बारिक चाऊन खावे. याने पोटात गॅस तयार होणार नाही.

दारू सोडा

लोकांना नेहमीच असं वाटतं की, जास्त पाणी प्यायल्याने त्यांचं शरीर फुगलेलं दिसतं. पण असं काही नाहीये. उलट पाणी कमी प्यायल्याने शरीर फुगू शकतं. जेव्हा तुम्ही पाणी सेवन करत नाहीत, तेव्हा शरीर तुमच्यात असलेलं पाणी वापरू लागतं आणि ज्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ लागतं. अशात तुम्हाला समस्या होऊ शकते. ही समस्या टाळायची असेल तर योग्य प्रमाणात पाणी प्यावे. तसे तुम्ही पाण्यात लिंबाचा टाकूनही सेवन करू शकता. याने पोटातील सूज कमी होण्यास मदत मिळते.

जेवण झाल्यावर चाला

अनेकजण जेवण झाल्यावर लगेच खुर्चीत बसून राहतात किंवा झोपतात. पण असं केल्याने तुमच्या पोटात सूज येऊ शकते. अशात चांगलं होईल की, जेवण केल्यावर थोडं फिरायला हवं. याने तुम्हाला अन्नही पचेल आणि पोटात सूजही येणार नाही. त्यासोबतच तुम्ही रोज काही वेळ पायी चालावे. याने शरीरही फिट राहतं.

जास्त च्युइंगम खाऊ नये

जास्त च्युइंगम खाल्ल्यानेही पोटात सूज येऊ शकते. च्युइंगम चावताना पोटात सर्वात जास्त हवा जाते. याने पोटात सूज येऊ लागते. ही सवय लगेच सोडा आणि पोटात सूज येण्यापासून बचाव करा. 

पोटातील सूज कमी करण्याचे घरगुती उपाय

बडीशेप

बडीशेपच्या बियांमध्ये वेदना कमी करण्याची क्षमता असते. सोबतच यात असेही काही तत्व असतात जे अन्न पचवण्यासही फायदेशीर ठरतात. तसेच पोटात सूज आली असेल तर याने दूर केली जाऊ शकते. जेवण केल्यावर नेहमी बडीशेप खाण्याची सवय लावा. याने पोटात सूज येणार नाही. आणखी एक उपाय करायचा तर तुम्ही चहामध्ये बडीशेप मिश्रित करून सेवन करू शकता. तसेच एक पाण्यात बडीशेप उकडून हे पाणी सेवन करावे.

आले

आल्याच्या मदतीने देखील आतड्यांवर येणारी सूज कमी करता येऊ शकते. सोबतच याने मांसपेशींना आरामही मिळतो. जर तुम्ही नियमित रूपाने आल्याचं सेवन करत असाल तर पोटातील सूज कमी केली जाऊ शकते. यासाठी आल्याचे काही तुकडे एका कपाक टाका आणि वरून गरम पाणी टाका. नंतर कपावर झाकण ठेवा. १० मिनिटांनी त्यात 1 चमचा मध आणि तेवढाच लिंबाचा रस टाका. या पाण्याचं सेवन करा.

लिंबू पाणी

लिंबात रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी आणि सी, फॉस्फोरस, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम असतात. तसेच यात हायड्रोक्लोरिक अॅसिडही असतं. जे अन्न पचवण्यासाठी शरीराची मदत करतं. त्यासोबतच आपल्या शरीरातून विषारी पदार्थही बाहेर काढतं. एक ग्लास गरम पाण्यात लिबांचा रस टाका आणि हे पाणी सेवन करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य