शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

कोरोनाकाळात पाण्यााद्वारे पसरणाऱ्या आजारांपासून बचावासाठी 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 16:04 IST

आजारी पडून दवाखान्यात जाण्याआधीच घरगुती पदार्थांनी तुम्ही स्वतःची काळजी घेतली तरी आजारांपासून लांब राहू शकता.

पावसाच्या वातावरणात वेगवेगळ्या आजाराचं संक्रमण पसरण्याचा धोका असतो. यामुळे ताप, सर्दी, खोकला मुख्य म्हणजे पोटाच्या समस्या सर्वाधिक उद्भवतात.  कारण पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यातून किंवा सांडपाण्याद्वारे संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो. पण आजारी पडून दवाखान्यात जाण्याआधी घरगुती पदार्थांनी तुम्ही स्वतःची काळजी घेतली तरी आजारांपासून लांब राहू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबाबत सांगणार आहोत ज्या पदार्थांचा समावेश तुम्ही आहारात करायला हवा जेणेकरून पाण्याद्वारे पसरत असलेल्या संसर्गजन्य आजारांपासून लांब राहता येईल. 

तुळस

तुळशीतील औषधी गुणांमुळे तुळशीचा समावेश औषधी वनस्पतींमध्ये करण्यात येतो. तुळशीच्या सेवनाने शरीरात सकारात्मक उर्जा प्रवाहीत होते व मानसिक दृष्ट्या व्यक्ती प्रबळ होण्यास मदत होते. एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी व्हायरल गुण तुळशीत असतात त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. नियमित तुळशीचं दूध किंवा तुळशीच काढा प्यायल्यानं आरोग्य चांगले राहते. पावसाळ्यात वातावरणात गारवा पसरलेला असतो. तुळशीचं पाणी किंवा तुळशीची पानं खाल्यानं शरीरातील गरमी टिकून राहण्यास मदत  होते.

लसूण

जे लोक सकाळी लसूण खातात. त्यांची पचनक्रिया नेहमी व्यवस्थित राहते. यामुळे पोटाचे विकार दूर होतात. वजन कमी करण्यासाठीही लसणाचं सेवन फायदेशी ठरतं. रक्त गोठण्याची समस्या अनेकांना उद्भवते. लसूण खाल्ल्यानं रक्त पातळ होण्यास मदत होते. त्यामुळे ब्लड क्लोटिंग थांबतं. जर तुम्हाला नुसता लसूण खाणं जमत नसेल तर तुम्ही भाज्यामध्ये जास्तीत जास्त लसणाचा वापर करू शकता.  लसूणात अ‍ॅलिसिन नावाचं कम्पाउंड असतं. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या कमी होते. याचे योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोग प्रतिकारक क्षमता देखील वाढते. रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असल्यास  गंभीर आजारांपासून लांब राहता येतं.

पुदिना

पुदिना कोणत्याही ऋतूत सहज उपलब्ध होतो.  जर आपल्याला पोटासंबंधी आजार असतील तर पुदिन्याच्या ताज्या पानामध्ये लिंबाचे रस व त्याच्या समान प्रमाणात मध मिळून सेवन केल्याने जवळ जवळ पोटाच्या सर्वच आजारांवर लवकर आराम मिळतो. सर्दी, तापाची समस्या उद्भवल्यास पुदिन्याचा रस घ्या आणि त्यात काळी मिरी,थोडं काळं मीठ घाला आणि ज्या प्रकारे आपण चहा बनवतो त्याच प्रकारे चहा सारखे उकळूवून घ्या व ते प्या, हा काढा सर्दी, खोकला, तसेच तापावर गुणकारी आहे.

टॉमॅटो

टॉमॅटोत अनेक एंटीऑक्सिडंट्स असतात. रक्त शुद्धीकरण करण्यासाठी, शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तसंच  संक्रामक रोगांपासून बचाव करण्यासाठी टॉमॅटो फायदेशीर ठरतो. टॉमॅटोच्या सेवनानं शरीराला उर्जा मिळते. तुम्ही टॉमॅटो सूप किंवा भाज्यांच्या माध्यमातूनही टॉमॅटोचं सेवन करू शकता.  त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक मिळतील. 

हे पण वाचा

नाष्त्याला पोहे खाण्याचे 'हे' ५ आरोग्यदायी फायदे वाचाल; तर रोज आवडीनं खाल

खुशखबर! इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही उपचारांशिवाय मानवी शरीरानं केली HIV वर मात

कोरोनातून बरं झाल्यानंतर फुफ्फुसांसह 'या' अवयवांवर होत आहे गंभीर परिणाम; तज्ज्ञांचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सWaterपाणी