शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात मटार खाणे फायदेशीर, वजन करा कमी आणि हृदय ठेवा निरोगी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 13:01 IST

Health Tips : खरंतर मटार खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण जास्त मटार खाणेही चांगलं नाही. कारण याने शरीरात गॅस तयार होते, असं तज्ज्ञ सांगतात.

Health Tips :  हिवाळाच्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतात. मटार सुद्धा हिवाळ्यात मिळणारी लोकप्रिय भाजी आहे. लोकांना कच्चे मटर खाणे तर पसंत आहेच. पण अनेकांना हे माहीत नसतं की, यात किती आरोग्यदायी तत्त्व आहेत. खरंतर मटार खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण जास्त मटार खाणेही चांगलं नाही. कारण याने शरीरात गॅस तयार होते, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे हिवाळ्यात याचं संतुलित सेवन केलं तर फायदा होऊ शकतो. 

वजन कमी करण्यास मदत

तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर मटार खाणे फायदेशीर ठरु शकतं. कारण यात भरपूर प्रमाणात फायबर आढळतं. सोबतच यात कॅलरी आणि फॅटही कमी असतात ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. सकाळी नाश्त्यात याचा समावेश केला तर यातील फायबरमुळे दिवसभर भरपूर एनर्जी मिळते.

हाडे होतात मजबूत

वेगवेगळ्या शोधातून हे समोर आलं आहे की, मटारमध्ये व्हिटॅमिन 'के' भरपूर प्रमाणात असतात. जे शरीरातील हाडांना मजबूत करतात. त्यासोबतच याने हाडांमध्ये होणाऱ्या ऑस्टियोपोसिसचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. याचा अर्थ मटार हाडांच्या सुरक्षेसाठी फायदेशीर आहे. 

कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं

हिरवे मटार आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. यात काही असे गुण असतात ज्यामुळे कोलेस्ट्रॉल स्तर वाढत नाही. सोबतच शरीरात ट्रायग्लिसराइड्सचा स्तरही मटार वाढू देत नाही. याचे सेवन केल्याने रक्तात कोलेस्ट्रॉल स्तर नियंत्रित राहतो आणि आपला अनेक आजारांपासून बचाव होतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

हिरव्या मटारमध्ये लोह, झिंक, मॅगनीज, कॉपर ही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. ही सर्व तत्त्वे शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यासोबतच यात अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व असतं, ज्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाते. याने शरीराला वेगवेगळ्या आजारांपासून लढण्यास मदत मिळते. 

हृदयरोगांपासून बचाव

हृदयरोगांनी ग्रस्त लोकांसाठी मटारचं सेवन फायदेशीर ठरतं. कारण याने हृदयासंबंधी वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करु शकतो. मटारमध्ये सूज कमी करणारे अँटी-ऑक्सिडेंट गुण असतात. याने हृदय निरोगी राहतं. 

केसगळती होते कमी

मटारमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे केसगळती रोखली जाऊ शकते. तसेच केस मुलायम आणि मजबूत होण्यासही मदत मिळते. त्यासोबतच यात असलेल्या व्हिटॅमिन बी ६, बी १२ आणि फॉलिक अॅसिड लाल रक्तपेशी तयार करण्यास फायदेशीर ठरतात. याने केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य