शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

डिहायड्रेशनची लक्षणे काय; उष्माघाताचा त्रास उद्भवल्यास अशी घ्या काळजी, काय सांगतात तज्ज्ञ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 15:27 IST

मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरातील तापमानात कमालीची वाढ झाली असून नागरिक हैराण झाले आहेत.

Health tips : मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरातील तापमानात  कमालीची वाढ झाली असून नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे आता काहींना उन्हामुळे डोकेदुखी आणि अतिसाराचा त्रास होत असल्याच्या तक्रारी दिसून येत आहेत. तर काही जण घसादुखीच्या समस्येने त्रस्त आहेत. मात्र, याला विषाणूचा संसर्ग जबाबदार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे. 

विषाणूच्या संसर्गामुळे घसादुखीच्या तक्रारी निदर्शनास येत आहेत. त्यामुळे डिहायड्रेशनची लक्षणे जाणवल्यास वेळीच  त्यावर उपचार केले पाहिजे. स्वतःहून उपचार करून घेण्याचा अट्टहास टाळावा. अतिउष्णतेमुळे अतिसार आणि डोकेदुखी होत असल्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. कारण मोठ्या प्रमाणात घाम येऊन शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे शरीरातील क्षार कमी होतात. आपसूकच त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. परिणामी, चक्कर येणे, मळमळ होणे या आजारांचा सामना करावा लागतो. यासाठी रस्त्यावर उपलब्ध असणाऱ्या शीतपेयांचे सेवन करू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. 

उष्माघाताचा त्रास उद्भवल्यास हे करा? 

१) पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेवून रुग्णाला आडवे झोपण्यास सांगावे.

२) त्रास झालेल्या व्यक्तीला लगेच घरात, सावलीच्या ठिकाणी बसवावे. 

३) थंड पाण्याच्या पट्ट्यांचा वापर करावा. सैल कपडे वापरावेत.

४) उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे. 

५) उष्माघातासारखे वाटल्यास जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा किंवा डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

अशी काळजी घ्या-

१) दुपारी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी.

२) दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शक्यतो घरात राहावे.

३) पांढरे, सौम्य रंगाचे, सैलसर कपडे वापरा, डोक्यावर टोपी घाला. असं केल्यास उन्हापासून संरक्षण होईल. 

४)  पुरेसे पाणी प्यावे, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या, त्यामुळे वारंवार घसा कोरडा पडणार नाही. 

अति उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येत आहेत. अति उन्हामुळे उष्माघात टाळण्यासाठी लोकांनी सजग राहणं गरजेचं आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सLifestyleलाइफस्टाइल