शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

गरमागरम वडा-समोसा पाहताच मोह आवरत नाही? पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाणं टाळा, कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 16:40 IST

पावसाळा आला की वाफाळता चहा आणि सोबत चमचमीत तळलेले पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते.

Health tips For Monsoon : पावसाळा आला की वाफाळता चहा आणि सोबत चमचमीत तळलेले पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. पाणीपुरी, भेळ, पॅटीस, गरमागरम भजी, पकोडे, मॅगी आणि असेच पदार्थ लोकं मोठ्या आवडीने खातात. रस्तोरस्ती गल्लीबोळात हातगाड्यांवर गरमागरम वडा-समोसे पाहिले की आपल्या जिभेला पाणी सुटतं. पण मनाने कितीही हट्ट केला तरी, आवर घाला आणि असे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळले पाहिजेत. कारण हे पदार्थ खाऊन आपसूकच विविध आजारांना निमंत्रण मिळू शकते. 

बऱ्याचदा वारंवार हे पदार्थ वापरलेलं तेल वाया जाऊ नये म्हणून त्यामध्ये इतर पदार्थही तळले जातात. मात्र, आपल्या प्रकृतीसाठी असे तेळकट पदार्थ खाणं नुकसानकारक आहे. परिणामी कर्करोगासारखे घातक आजार होण्याची शक्यता जास्त असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

काय परिणाम होतो-

खाद्यपदार्थ तळलेले तेल पुन्हा-पुन्हा गरम केल्याने त्याची रचना बदलते. त्यात एक्रोलिन हे विषारी तसेच कर्करोगजन्य रसायन तयार होते. एकाच तेलात वारंवार तळलेले पदार्थ खाल्ल्यास उच्च रक्तदाब एथेरोस्केलेरेसिस, अल्झायमर, यकृताचा आजार यांसारखे आजार होण्याची भीती वाटते. 

मिश्र तेल, साधेल मेळ-

आरोग्य उत्तम राहण्यासाठी तुम्ही मिश्रित तेलाचा वापर करू शकता. जसे पूर्वी तांदळाचा कोंडा ( राईस ब्रान) तेल आणि सोयाबीन शिवाय पूर्वी वेगवेगळ्या भाज्या,डाळी तसेच अन्नपदार्थ तयार करण्यासाठी कधी करढई तर कधी सूर्यफूल तर कधी खोबऱ्याचे  तेल वापरले जायचे. त्यामुळे प्रत्येक वेळी आहारात वेगवेगळ्या तेलाचा वापर करा असं, आहारतज्ज्ञ सांगतात. 

तळलेले पदार्थ  खाणं जीवावर बेतणार- 

घरी वडापाव समोसा बनण्याचा बेत करत असाल तर एकदा तेल वापरले की त्याचा नंतर खाण्यात वापर करा. मात्र, ते वारंवार गरम करणे अथवा पुन्हा त्याचा खाण्यासाठी वापर करणे टाळा. यामुळे त्यात मोठ्या मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॅट तयार होतात. त्याच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि कर्करोग होण्याची शक्यताही नाकारता येता नाही. तेलाचा पुन्हा- पुन्हा तळण्यासाठी वापर करणे टाळा कारण हे करणं जीवावर येत असलं तरी ते जीवावर बेतेल एवढं मात्र नक्की. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तळलेले पदार्थ खाणं टाळलं तर योग्य ठरेल. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सmonsoonमोसमी पाऊसcancerकर्करोगLifestyleलाइफस्टाइल