शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

थकवा, पोटदुखी, चेहराही झालाय निस्तेज; मग या लक्षणांकडे दूर्लक्ष करणं पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 16:17 IST

पावसाळा आल्याने रोगराईचा धोका अधिक वाढतो.

Health Tips For Monsoon : पावसाळा आल्याने रोगराईचा धोका अधिक वाढतो. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळा आला की तो आपल्यासोबत असंख्य आजारांनाही घेऊन येतो. सर्दी, खोकला यासोबतच कळून न येणारा आजार म्हणजे कावीळ. काविळीची नेमकी लक्षणे काय असतात जाणून घेऊया...  हेपेटायटिस (कावीळ) या आजाराबद्दल आपल्याकडे आजही खूप गैरसमज आहेत, वैद्यकीय शास्त्रात या आजारावर उपचार आहेत. व्हायरल हेपेटायटिसचे पाच प्रकार आहेत. हेपेटायटिस 'ए', 'बी', 'सी', 'डी', आणि 'ई' हे वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये काही जे प्रकार आहेत, ते काही कालावधीमध्ये बरे होतात, तर काही प्रकार आयुष्यभर सोबत असतात, त्यामध्ये 'ए' आणि 'ई' या प्रकारचा कावीळ हा दूषित पाण्यामुळे होतो. यामुळे शरीराच्या यकृतावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात विशेषकरून बाहेरचे पदार्थ खाऊ नये. त्यासोबत स्वच्छ पाणी प्यावे. त्यामुळे या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध घालण्यास मदत होईल.

लक्षणे काय?

१) त्वचा पिवळी पडणे

२) डोळ्यांचा रंग पिवळा होणे

३)  थकवा

४) पोटदुखी

५) चेहरा निस्तेज 

काय काळजी घ्याल?

पावसाळ्याच्या काळात शक्यतो उघड्यावरील पदार्थ खाणे टाळले पाहिजे. पाणी दूषित असल्यास पाण्यातून जंतूंचा प्रवेश पोटात होऊ शकतो. त्यामुळे पोटाच्या विविध प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागते. कोणतेही पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, गरम पदार्थ खावेत. अनेकदा असं आवाहन आरोग्यतज्ज्ञांकडून करण्यात येतं.

'हेपेटायटिस ए' आजारावर लस-

हेपेटायटिस ए आणि 'ई' या आजाराचे रुग्ण वर्षभर आढळतात. मात्र, पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढते. आजाराचे रुग्ण जास्त दिसतात. दोन्ही आजारांमध्ये रुग्णांना उपचार दिले जातात. हेपेटायटिस ए आणि 'ई' हे आजार दूषित पाण्यामुळे होतात. यामध्ये हेपेटायटिस ए या आजारावर लस विकसित झाली. त्या लसींद्वारे आपण या आजाराला प्रतिबंध घालू शकतो. अनेक लहान बाळाना ही लस दिली जातेः मात्र हेपेटायटिस ई'साठी अजून कोणतीही लस विकसित झालेली नाही.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सmonsoonमोसमी पाऊसLifestyleलाइफस्टाइल