शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'हे' पदार्थ चहात वापरल्यास पडू शकतं महागात, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 17:01 IST

Health Tips : कॅनडामध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला हाय ब्लड प्रेशरच्या तक्रारीनंतर इमरजन्सीमध्ये रूग्णालयात भरती केलं गेलं. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, तुम्ही काय खाल्लं किंवा प्यायलं होतं?

Health Tips :  अनेकांना असं वाटतं की, आयुर्वेदिक आणि हर्बल पदार्थांचं सेवन केल्याने तुम्ही निरोगी राहू शकता. तसेच असाही समज असतो की, आयुर्वेदिक गोष्टींचे कोणते साइड इफेक्टही नसतात. पण हा समज चुकीचा आहे. हर्बल प्रॉडक्टचेही गंभीर साइड इफेक्ट असू शकतात. कॅनेडियन मेडिकल असोसिएशन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित एका नव्या रिपोर्टमध्ये इशारा देण्यात आला आहे की, हर्बल जडी-बूटीपासून तयार पदार्थांचेही साइड इफेक्ट असतात आणि जर तुम्ही त्यांचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

हाय बीपीच्या तक्रारीनंतर रूग्णालयात करावं लागलं दाखल

कॅनडामध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला हाय ब्लड प्रेशरच्या तक्रारीनंतर इमरजन्सीमध्ये रूग्णालयात भरती केलं गेलं. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, तुम्ही काय खाल्लं किंवा प्यायलं होतं? तेव्हा रूग्णाने सांगितलं की, त्यांने ज्येष्ठमधाचा होममेड चहा सेवन केला होता, ज्यानंतर हाय ब्लड प्रेशरची स्थिती निर्माण झाली.

ज्येष्ठमधाच्या अधिक वापराने नुकसान

कॅनडाच्या मेकगिल युनिव्हर्सिटीचे जीन पेरी फॅलेट सांगतात की, हर्बल प्रॉडक्ट्सचं जर अधिक प्रमाणात सेवन केलं गेलं, तर याचे साइड इफेक्ट्स होतात. ज्या प्रॉडक्ट्समध्ये ज्येष्ठमधाचा वापर केला जातो, त्यांच्या सेवनामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं. तसेच याने डोकेदुखी आणि छातीत वेदना अशाही समस्या होऊ शकतात. फॅलेट सांगतात की, जर ज्येष्ठमधाचा वापर केलेल्या पदार्थांचं सेवन जास्त प्रमाणात केलं तर बीपी वाढण्यासोबतच शरीरात वॉटर रिटेंशन होतं आणि पोटॅशिअमचं प्रमाणही कमी होतं.

ज्येष्ठमधाच्या चहाचं केलं होतं सेवन

या रिसर्चमध्ये सहभागी अभ्यासकांनी सांगितले की, कॅनडाच्या रुग्णालयात ज्या व्यक्तीला दाखल करण्यात आलं होतं, त्यांचं वय ८४ होतं आणि ते ज्येष्ठमधाच्या होममेड चहाचं फार पूर्वीपासून सेवन करत आले. त्यांचा बीपी प्रमाणापेक्षा अधिक वाढला होता. ज्यामुळे त्यांना डोकेदुखी, छातीत वेदना, फार जास्त थकवा आणि पायांमध्ये फ्लूइड रिटेंशनची समस्या झाली होती. रुग्णाने डॉक्टरांना सांगितले की, गेल्या दोन आठवड्यापासून दररोज दिवसातून १ किंवा २ ग्लास होममेड ज्येष्ठमधाच्या चहाचं सेवन करत होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य