शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅंटी-बायोटिक औषधांच्या साइड इफेक्टपासून बचाव करण्याचे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 12:23 IST

अ‍ॅंटी-बायोटिक औषधांचा वापर बॅक्टेरिअल इंन्फेक्शनच्या उपचारासाठी केला जातो. याचं सेवन केल्याने बॅक्टेरिया नष्ट केले जातात आणि त्यांचा विकासही नष्ट केला जातो.

जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कान, डोळे, घशाच्या इन्फेक्शनने ग्रस्त असाल तर डॉक्टर अ‍ॅंटीबायोटिक औषधे घेण्याचा सल्ला देतात. अ‍ॅंटी-बायोटिक औषधांचा वापर बॅक्टेरिअल इंन्फेक्शनच्या उपचारासाठी केला जातो. याचं सेवन केल्याने बॅक्टेरिया नष्ट केले जातात आणि त्यांचा विकासही नष्ट केला जातो. पण याचं जास्त सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक प्रणाली कमजोर होते. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांच्या जाळ्यात तुम्ही ओढले जाता. पण अ‍ॅंटीबायोटिकचे साइड इफेक्ट काही घरगुती उपयांनी तुम्ही दूर केले जाऊ शकतात. चला जाणून घेऊ काय आहेत हे उपाय...

प्रोबायोटिक दह्याचं सेवन करा - जेव्हा तुम्ही अ‍ॅंटीबायोटिकचं सेवन करता तेव्हा तुम्हाला दही खाण्याचा सल्ला दिला जातो. या दह्यामुळे तुमचा डायरिया होण्यापासून बचाव होतो. डायरिया अ‍ॅंटीबायोटिकचा सर्वात सामान्य साइड इफेक्ट आहे. त्यामुळे दही खाल्ल्याने शरीरात लॅक्टिक अ‍ॅसिड तयार होतं आणि याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.  

आलं खा - आलं एक नैसर्गिक अ‍ॅंटीबायोटिक आहे. याने नुकसानकारक मायक्रोब्सला अ‍ॅंटीबायोटिकचे साइड इफेक्ट न होऊ देता नष्ट केलं जातं. आल्यामध्ये महत्वपूर्ण तत्त्व एलिसिन असतं, जे किडनी आणि लिव्हरची अ‍ॅंटीबायोटिकपासून रक्षा करतं. आहारातून आल्याचं सेवन केल्यास शरीरातील सर्व विषारी तत्त्व नैसर्गिक पद्धतीने बाहेर पडतात. तुम्ही आलं चहाच्या रूपातही सेवन करू शकता. 

पाणी प्या - औषधांमुळे तोंड कोरडं पडतं. तसेच अ‍ॅंटीबायोटिकच्या साइड इफेक्टमुळे डायरिया, उलटी यांसारख्या समस्याही होतात. याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्यावे. तसेच हिरव्या भाज्या आणि फळांचंही सेवन करावं. याने शरीरातील पाणी नियंत्रित राहतं. 

ब्रेड, डेअरी उत्पादनांचं सेवन करा - अ‍ॅंटी-बायोटिकच्या साइड इफेक्टपासून बचाव करण्यासाठी तुम्ही डेअरी उत्पादने, क्रेकर आणि ब्रेड यांचं सेवन करायला हवं. सोबतच जेव्हा तुम्ही अ‍ॅंटी-बायोटिकचं सेवन करत असाल तेव्हाही याचं सेवन करावं. हे सहजपणे पचतात आणि पचनक्रियेलाही आराम मिळतो. त्यामुळे तुम्ही लवकर बरे होऊ शकता. 

(टिप : वरील सल्ले हे सामान्य माहितीवर आधारित आहेत. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे यांचा वापर करण्याआधी तज्ज्ञांशी एकदा नक्की संपर्क साधा.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य