शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

दूधासोबत चुकूनही खाऊ नये हे पदार्थ, पडू शकतं महागात; जाणून घ्या कसं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 09:30 IST

Health Tips : जे लोक बॉडी बनवण्याच्या प्रयत्नात असतात, त्यांना ब-याचदा केळी आणि दूध सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

Health Tips : दूधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. पण काही दुस-या पदार्थांसोबत दूध पिण्याचे काही दुष्परिणामही आहेत. आयुर्वेदानुसार त्या पदार्थांसोबत दूध प्यायल्यास पचनासंबंधी समस्या, वजन वाढणं आणि त्वचेशी निगडीत समस्या होतात. जे लोक बॉडी बनवण्याच्या प्रयत्नात असतात, त्यांना ब-याचदा केळी आणि दूध सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण या कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अशा आणखी काही गोष्टी आहेत ज्या दूधासोबत खाऊ नये. 

1) केळीसोबत

तुम्ही जिमला जाणा-यांना तुम्ही अनेकदा केळीसोबत दूधाचे सेवन करताना पाहिले असेल. पण दूधासोबत केळी किंवा ताक पिणे घातक ठरु शकतं. यामुळे पचनप्रक्रिया बिघडू शकते आणि शरीरात टॉक्सिन वाढण्याची शक्यता असते. यासोबतच तुम्हाला सर्दी-खोकला आणि अॅलर्जीची समस्याही होऊ शकते. 

2) मासे आणि दूध

चुकूनही मास्यांसोबत दूध घेऊ नये किंवा मासे खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये. असे सांगितले जाते की, मासे खाल्ल्यानंतर दूध प्यायल्यास चेह-यावर पांढरे डाग येतात. तसेच अॅसिडीटी आणि ओकारीची समस्याही होते. 

3) आंबट फळासोबत

आयुर्वेदानुसार, दूध आणि फळांचं एकत्र सेवन करु नये. कारण दूध एक लॅक्सेटिव्ह आहे. त्यासोबतच फळे पचायला हलके असतात आणि दूध पचायला वेळ लागतो. यामुळे तुम्हाला पोट दुखी आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

4) या गोष्टींची घ्या काळजी

आयुर्वेदानुसार, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट यांचं एकत्र सेवन करु नये. दूधासोबत केळी खाल्ल्यास कफ होण्याची शक्यता आहे. यासोबतच यांच्या एकत्र सेवनाने पचनक्रियेवर परिणाम होतो. अनेकांना तुम्ही दूधासोबत ब्रेड-बटर खातांना पाहिले असेल, पण यामुळे जडपणा वाटू शकतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य