शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Health Tips : आपल्यालाही आहे कमी पाणी पिण्याची सवय? तर सावध व्हा, हे आजार करू शकतात अ‍ॅटॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 18:35 IST

Disadvantages of drinking less water​​ : पाणी न प्यायल्याने अथवा फार कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने कोणकोणत्या आजारांचा सामना करावा लागू शकतो, जाणून घ्या...

योग्य प्रमाणात पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहीत आहे. कारण पाणी न प्यायल्याने अथवा खूपच कमी पाणी प्यायल्याने शरीर डिहायड्रेड होते. आपल्या शरीरात जवळपास 60 टक्के पाणी असते. त्यामुळे शरीराच्या सर्व अवयवांचे कार्य व्यवस्थित रित्या चालावे यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे आपले शरीर अनेक आजारांपासून दूर राहते. तर, पाणी न प्यायल्याने अथवा फार कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने कोणकोणत्या आजारांचा सामना करावा लागू शकतो, यासंदर्भात जाणून घेऊयात...

फार कमी पाणी प्यायल्याने होऊ शकतात हे आजार - लठ्ठपणाची समस्या -लठ्ठपणामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. कमी पाणी पिणे म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण देण्यासारखे आहे. तसेच, आपण अनेक वेळा योग्य प्रमाणात खातो, पण पाणी मात्र, फारच कमी पितो. यामुळे नेहमीच भूक लागल्यासारखे होते आणि आपण अनेक वेळा अधिक खातो. परिणामी लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. यामुळे शरिरात योग्य प्रमाणावर पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. 

पेटाच्या समस्या - कमी पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते. पाणी कमी प्यायल्याने ही समस्या वाढूही शकते. कारण पाण्याच्या कमतरतेमुळे पोटात अॅसिड तयार होण्याचा वेग वाढतो, यामुळे पोटात गॅस तयार होतो. याशिवाय कमी पाणी प्यायल्याने छातीत जळजळ होण्याची समस्याही होऊ शकते. 

तोंडाचा वास येणे - पाणी कमी प्यायल्याने तोंडाचा वास येण्याची समस्याही मोठ्या प्रमाणावर वाढते. कम पाणी प्यायल्याने तोंडाला कोरड पडते. यामुळे तोंडात बॅक्टेरिया तयार होतात. यामुळे तोंडाचा वास येऊ लागतो. यामुळे तोंडाचा वास येऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्य