शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

काय असतात हार्ट ब्लॉकेजची लक्षणे आणि कारणे, जाणून घ्या काही नैसर्गिक उपाय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 15:25 IST

Heart Blockage causes : जेव्हा हार्ट ब्लॉकेज होतं तेव्हा हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि सामान्यापेक्षा हळू गतीने हृदय काम करतं. हृदयाचे ठोके एकावेळी 20 सेकंद उशीराने होतात.

Heart Blockage causes : हार्ट ब्लॉकेज झाल्यावर हृदयाचं इलेक्ट्रिक सिस्टम प्रभावित होतं. ही समस्या कोरोनरी आर्टी डिजीजपेक्षा वेगळी आहे. ज्यात हृदयाच्या रक्त वाहिन्यांवर प्रभाव पडतो. जेव्हा हार्ट ब्लॉकेज होतं तेव्हा हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि सामान्यापेक्षा हळू गतीने हृदय काम करतं. हृदयाचे ठोके एकावेळी 20 सेकंद उशीराने होतात.

हार्ट ब्लॉकेजची लक्षणे

- हृदयाचे ठोके कमजोर होणे किंवा अनियमित होणे, तसेच घाबरल्यासारखं वाटणे

- श्वास घेण्यास समस्या होणे

- डोक्यात चक्कर येणे

- छातीत वेदना आणि अस्वस्थ वाटणे

- शरीरार व्यवस्थित रक्त पुरवठा होत नसल्याने एक्सरसाइज करण्यात अडचण येणे

हार्ट ब्‍लॉकेजची कारणे

काही लोकांमध्ये जन्मापासूनच हार्ट ब्लॉकेजची समस्या असते, या स्थितीला जन्मजात हार्ट ब्लॉक म्हटलं जातं. जर गर्भात अर्भकाचं हृदय योग्यप्रकारे विकसित झालं नाही तर अर्भकाला जन्मापासूनच हार्ट ब्लॉकेजची समस्या होते.

तसेच हृदयाची इलेक्ट्रिक सिस्टम प्रभावित करणारी एखादी सर्जरी, जीन्समध्ये बदल, हार्ट अटॅकने हृदयाची गती हळू होणे, धमण्यांमध्ये अडथळा, हृदयाच्या मांसपेशींमध्ये सूज आणि हार्ट फेल्युअरमुळे हार्ट ब्लॉक होऊ शकतं. अनेकदा एखाद्या औषधामुळेही हार्ट ब्लॉकेजची समस्या होऊ शकते. अशा स्थितीत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

समस्या टाळण्यासाठी उपाय

- अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, रोज एक कप डाळिंबाचं ज्यूस सेवन केल्याने रक्त शुद्ध होतं, रक्तप्रवाह सुरळित राहतो आणि ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहतं. तसेच कोरोनरी आर्टरी डिजीजच्या रूग्णांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी होतं. डाळिंबात असलेले पॉलीफेनॉल्स शरीरात प्लाक जमा होणं रोखतं.

- रोज 120 मिली ग्रॅम इतकी दालचिनी पावडर सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडचं प्रमाण कमी होतं. हेही लक्षात घ्या की, बॅड कोलेस्ट्रॉल हार्ट ब्लॉकेजचं मुख्य कारण होऊ शकतं. याने व्यक्तीच्या हृदयासंबंधी इतरही समस्या वाढू शकतात.

- सामान्यपणे असं पाहिलं जातं की, बॅड कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाची धमण्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. लाल मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचं तत्व असतं ज्यात हे बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्याची क्षमता असते. कॅप्सेसिन ब्लड प्रेशर कमी करणे, हाय कोलेस्ट्रॉल आणि रक्ताच्या गाठी तयार होण्यापासून रोखल्या जातात.

- लसूण खाल्ल्याने केवळ हृदय निरोगी राहतं असं नाही तर अनेक आजारांपासून बचाव होतो. यात अ‍ॅंटीकोएगुलेंट गुण असतात जे रक्त पातळ करण्यास मदत करतात. या कारणाने लसूण हार्ट अटॅक आणि स्ट्रोकला रोखण्यास सक्षम असतं.

- हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं तत्व असतं ज्यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, सूज आणि रक्ताच्या गाठी रोखण्याची क्षमता असते. हळदीचं नियमित सेवन केल्याने आरोग्य चांगलं राहतं. याने हार्ट ब्लॉकेजची समस्याही कमी होते.

- जर तुम्हाला हृदयासंबंधी समस्या असेल तर तुम्हाला नियमित चांगला आहार घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही आहाराचं नियोजन करू शकता.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य