शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दुपारी किती वेळ झोपणं फायदेशीर असतं? जाणून घ्या नुकसान सुद्धा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 17:11 IST

Health Tips : दुपारी जास्त वेळ झोपल्याने काय नुकसान होतात हे माहीत आहेत का? चला जाणून घेऊ काय सांगतो रिसर्च....

काही लोक थकवा किंवा सवयीमुळे दुपारी झोप घेतात. अनेकदा घर सांभाळणाऱ्या महिला घरातील काम संपवल्यावर दुपारी थोडावेळ झोपणं पसंत करतात. पण दुपारी किती वेळ झोप घेणं फायदेशीर असतं हे अनेकांना माहीत नसतं. तुम्हाला माहीत आहे का? दुपारी जास्त वेळ झोपल्याने काय नुकसान होतात हे माहीत आहेत का? चला जाणून घेऊ काय सांगतो रिसर्च....

दुपारी थोडा वेळ झोपण्याचे फायदे

आराम मिळतो

मूड चांगला म्हणजेच फ्रेश होतो

प्रतिक्रिया देण्याची क्षमता वाढते

स्मरणशक्तीत वाढ होते

सतर्कता वाढते

थकवा दूर होतो

दुपारी झोपण्याचे नुकसान

स्लीप इनर्शिया अशा स्थितीला म्हटलं जातं, ज्यात मनुष्य अर्धा जागा आणि अर्धा झोपेत असतो. या स्थितीत मनुष्याची विचार करण्याची, समजण्याची क्षमता कमी होऊ शकते. ही स्थित नेहमीच सामान्यपणे झोपेतून जागे झाल्यावर होऊ शकते.दिवसा झोपल्या कारणाने तुम्हाला रात्री झोप न येण्याची समस्या होऊ शकते. जर तुम्हाला रात्री इंसोम्नियाची समस्या असेल किंवा झोप येत नसेल, तर दुपारी झोपल्याने ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

दुपारी किती वेळ झोप घ्यावी?

अभ्यासक Rajiv Dhand आणि Harjyot Sohal द्वारे नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, दिवसा केवळ ३० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळ झोप घेणंच फायदेशीर ठरू शकतं. यापेक्षा जास्त वेळ दुपारी झोपल्याने तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकतं. त्यासोबतच एक्सपर्टचा सल्ला आहे की, तुम्ही दुपारी ३ वाजतानंतर अजिबात झोपू नये. याने तुम्हाला रात्री झोपण्यास समस्या येऊ शकते. सोबतच दुपारी पावर नॅप घेताना तुमच्या आजूबाजूला अंधार आणि शांत वातावरण असावं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य