शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
4
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
5
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
8
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
9
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
10
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
13
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
14
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
15
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
16
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
17
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
18
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
19
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
20
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत

Health Tips : 'या' दोन पदार्थांमुळे कमी होत आहे तुमचं आयुष्य, वाचा जास्त जगायचं असेल तर काय खावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 17:09 IST

Food for long life : जर कुणी हेल्दी डाएट घेत असेल तर ते निरोगी आणि फिट राहतात. तर अनहेल्दी फूड खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि शरीर अनेक आजारांचं घर बनतं. आजार झाल्यावर लोकांचं जीवन हळूहळू कमी होऊ लागतं.

Food for long life : निरोगी आणि फिट राहण्यासाठी लोक नको नको ते करतात. सकाळी उठून कोमट पाणी पिण्यापासून ते रात्री जेवणानंतर फिरायला जाण्यापर्यंत अशी काम लोक करतात. पण एक्सपर्ट सांगतात की, निरोगी आणि फिट राहण्यासाठी सर्वात फायदेशीर ठरते तुमची डाएट. जर कुणी हेल्दी डाएट घेत असेल तर ते निरोगी आणि फिट राहतात. तर अनहेल्दी फूड खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि शरीर अनेक आजारांचं घर बनतं. आजार झाल्यावर लोकांचं जीवन हळूहळू कमी होऊ लागतं.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जे लोक आपल्या डाएटमध्ये रेड मीट आणि प्रोसेस्ड मीटऐवजी डाळ, हिरव्या भाज्या आणि नट्सचा समावेश करतात ते लोक १३ वर्ष अधिक जास्त जगतात. असंही सांगण्यात आलं आहे की,  जर वयोवृद्ध लोकांनीही आपल्या डाएटमध्ये या फूड्सचा समावेश केला तर तेही ३ ते ८ वर्ष अधिक जिवंत राहू शकतात.

काय सांगतो रिसर्च?

PLOS मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, डाएटमध्ये रेट आणि प्रोसेस्ड मीटच्या तुलनेत जास्त कडधान्य, भाज्या आणि नट्स यांचा समावेश केल्याने आयुष्य वाढण्यास मदत मिळते. नॉर्वेमध्ये झालेल्या रिसर्चनुसार, परदेशात राहणारे लोक डाएटमध्ये ड्रायफ्रूट्स, फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करत नाहीत. वेस्टर्न कल्चरमध्ये जे पदार्थ असतात त्यात अधिक प्रमाणात प्रोसेस्ड फूड किंवा तयार पदार्थ, रेड मीट आणि डेअरी प्रॉडक्ट असतात. अशा आहाराने लठ्ठपणा, डायबिटीज, कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. ज्याने आयुष्य कमी होतं.

एक्सपर्ट्सनी सांगितलं की, जर परदेशात राहणारे लोकही चांगली डाएट फॉलो करतील आणि डाएटमध्ये कडधान्य, शेंगा आणि नट्सचा समावेश करतील तर ते लोक खराब आहार घेणाऱ्या लोकांच्या तुलनेत १३ वर्ष अधिक  जगू शकतात. बर्गन यूनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांना आढळलं की, जर एखादी ६० वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश करत असेल तर तेही त्यांचं आयुष्य साधारण ८.५ वर्षाने वाढवू शकतात. तेच जर ८० वर्षाच्या व्यक्तीने डाएटमध्ये या फूड्सचा समावेश केला तर ते त्यांचं आयुष्य ३.५ वर्षाने वाढवू शकतात.

२२५ ग्रॅम धान्य आणि २५ ग्रॅम ड्राय फ्रूट्स

रिसर्चमध्ये सामान्य यूरोपियन आणि अमेरिकी डाएटची तुलना कॉम्प्युटरच्या माध्यमातून करण्यात आली होती. रिसर्चरने सांगितलं की, जर कुणी २० वर्षाची व्यक्ती असेल जी कोणत्याच शेंगांचं सेवन करत नाही. जर त्याने दिवसातून २०० ग्रॅम शेंगा, एक वाटी डाळचं सेवन केलं तर त्याचं वय २.५ वर्षाने वाढेल. वेगवेगळ्या शेंगांमध्य प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. 

सोबतच एक्सपर्ट म्हणाले की, रेड आणि प्रोसेस्ड मीटचं सेवन बंद करा. कारण त्यात फॅट आणि मिठाचं प्रमाण अधिक असतं. जर हे पूर्णपणे खाणं बंद केलं तर तुम्ही चार वर्षे अधिक जगू शकता. या रिसर्चचे मुख्य लेखक आणि न्यूट्रिशन एक्सपर्ट प्राध्यापक लार्स फडनेस म्हणाले की, डाएट कॅलक्यूलेट केल्याने लोकांना चांगल्या प्रकारे डाएट घेण्यास मदत मिळू शकते.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यResearchसंशोधन