शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Health : ...म्हणून विना मेडिकल चेकअप जॉईन करू नये ​जिम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 17:27 IST

जिम जॉईन करण्याचा विचार करीत असाल तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सल्ला अत्यावश्यक आहे.

-रवींद्र मोरे जिममध्ये व्यायाम करताना १७ वर्षीय अजिंक्य पांडूरंग लोळगे या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पालघरमध्येही ३० वर्षीय जेनिडा कार्व्हालो या तरुणीचा व्यायाम करताना मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूचे कारणही एकच आहे, ते म्हणजे ह्रदयावर अतिदाब वाढल्याने मृत्यू होणे. बऱ्याचदा आपण फक्त सेलेब्रिटींचे अनुकरण करून रात्रंदिवस बॉडी बनविण्यासाठी जिममध्ये मेहनत घेतो. मात्र कदाचित आपणास माहित नसेल प्रत्येक सेलेब्स जिम जॉईन करण्याअगोदर संपूर्ण बाडी चेकअप करतात आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच जिम जॉइन करतात. यावरून आपणही जिम जॉईन करण्याचा विचार करीत असाल किंवा जिम जॉईन केली असेल तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सल्ला अत्यावश्यक आहे. * व्यायाम करताना काय काळजी घ्याल-जिम जॉईन करण्याअगोदर डॉक्टारांकडून एकदा शरीराची तपासणी करुन घ्या.-प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाशिवाय जिममध्ये कोणताही व्यायाम प्रकार करू नका. -एका दिवसात शरीर फुगवणे किंवा कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. तुमच्या शारीरिक क्षमतेप्रमाणेच व्यायाम करा.-व्यायाम करताना वॉर्मअप जसा महत्वाचा आहे, तसेच शरीराला कुल डाऊन करणेही महत्वाचे आहे.-पहिल्याच दिवशी खूप व्यायाम करणे धोकादायक आहे. व्यायाम हा टप्प्या टप्प्याने वाढवत जायचा असतो.-तुमच्या व्यायामप्रमाणे तुमच्या आहाराचेही नियोजन करा. -शरीराला विश्रांतीची फार गरज असते, त्यामुळे आठवड्यातील १ दिवस व्यायामापासून सुट्टी घ्या.-आरोग्य हिच धनसंपदा आहे, त्यामुळे त्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. Also Read : ​Health : 'या' चुकांमुळे जिममध्ये जाऊनही मिळत नाही परफेक्ट फिगर !                    : Health : ​जिममध्ये न जाता घरीच बनवा पिळदार शरीर, करा हे उपाय !