शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

Health : ​आला पावसाळा, आरोग्य सांभाळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2017 17:09 IST

पावसाळ्यात आजारांपासून लांब राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

-Ravindra Moreनुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली असून बहुतांश लोक आंनद लुटत आहेत. मात्र पावसाचा आनंद घेताना आरोग्याचीही काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात बरेच आजार डोके वर काढतात. पावसाळ्यात तयार होणाऱ्या डबक्यांमुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे डेंग्यू, हिवताप, मलेरिया, टायफाईट आदी आजार होतात. शिवाय पावसात भिजल्याने अंगावरील ओले कपडे, वातावरणातील दमटपणा आणि गारवा यामुळेही आजारांना निमंत्रण मिळू शकते. पावसाळ्यात आजारांपासून लांब राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात होतात हे आजार अंगावर ओले कपडे, जास्त वेळ पावसात भिजणे यांमुळे सर्दी खोकल्यासारखे किरकोळ आजार उद्भवतात. यादिवसात प्रामुख्याने डास चावल्यामुळे हिवताप किंवा मलेरिया होतो. एनॉफिलीस जातीच्या मच्छराने दंश केल्यास हिवतापाची लागण लगेच होते. ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्यात दमा असणाऱ्या रुग्णांना त्रास जास्त जाणवतो. दमट, गार हवा आणि मंद पचनशक्ती यामुळे दम्याचा त्रास वाढतो. पावसाळ्यात पाण्याची प्रदुषण जास्त होते. त्यामुळे जुलबा आजार उद्भवण्याची शक्यता असते. तसेच पावसात जास्त वेळ भिजल्यास किंवा ओली चप्पल पायात जास्त वेळ ठेवल्यास चिखल्या होतात.काय उपाय कराल?पावसात भिजल्यास तत्काळ कपडे बदलावे आणि अंग कोरडे करावे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घराच्या परिसरात पाण्याची डबके तयार होऊ देऊ नयेत. शिवाय स्वच्छता ठेवून डास प्रतिबंधक औषधे, जाळ्या यांचा वापर करणे. अशुद्ध पाण्यामुळे पोटाचे विकार होऊ नयेत म्हणून स्वच्छ किंवा उष्ण पाणी प्यावे. एवढे प्रयत्न करुनही आजाराची काही लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आहाराची काय काळजी घ्याल?पावसाळ्यात पचनसंस्था मंद होते म्हणून जड आहार शक्यतो टाळावा. या दिवसात पचन न होणारा आहार घेतल्यास शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. थंड पदार्थ, तेलकट पदार्थ, फास्ट फुड, उपवासासाठी शेंगदाणे किंवा भगर हे पचन बिघडविणारे पदार्थ खाणे टाळावे. त्याऐवजी बेसन लाडू, टोमॅटो सुप, वांगी, भेंडवळ, कैरी, लिंबु, चिंच, सुखे खोबरे आदी पचायला हलके आणि उष्ण पदार्थांचा वापर करावा. Also Read : ​​पावसाळ्यात घ्या सायकलिंगचा मनमुराद आनंद! ​                    मुंबईकरांनी पावसाळ्यात ‘या’ गोष्टींचा अनुभव अवश्य घ्यावाच !