शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

7 पैकी 1 भारतीय व्यक्ती 'या' गंभीर आजाराने पीडित, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 15:15 IST

Health : भारतीय लोकांच्या मानसिक आरोग्याबाबत एक रिसर्च समोर आला असून हा रिसर्च लॅन्सेट सायकायट्री नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

Health :  बदलत्या लाइफस्टाईलमुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. तसंच अनेकजण मानसिक आरोग्याकडेही दुर्लक्ष करतात आणि नंतर त्यांना जास्त समस्यांचा सामना करावा लागतो. 

भारतीय लोकांच्या मानसिक आरोग्याबाबत एक रिसर्च समोर आला असून हा रिसर्च लॅन्सेट सायकायट्री नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या रिसर्चनुसार, देशातील प्रत्येकी 7 पैकी 1 भारतीय गंभीर मानसिक आजाराने पीडित आहे. ही आकडेवारी 2017 असून आता ही वाढली असण्याचीही शक्यता आहे.

किती लोक मानसिक आजारांनी पीडित?

हा रिसर्च ‘इंडिया स्टेट लेवल डिजीज बर्डन इनिशिएटिव्ह’ने केला आहे. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, डिप्रेशन आणि एग्जायटी म्हणजे अस्वस्थता सर्वात कॉमन मानसिक आजार आहे. आणि देशात या दोन आजारांनी पीडित लोकांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे.

भारतात 1990 पासून ते 2017  च्या आकडेवारीवर आधारित हा रिसर्च आहे. यात सांगण्यात आले आहे की, भारताच्या 19.7 म्हणजे साधारण 20 कोटी लोक मानसिक आजाराने पीडित आहेत आणि हा एकूण लोकसंख्येचा 14.3 टक्के भाग आहे. यातील 4.6 कोटी लोक डिप्रेशन आणि 4.5 कोटी लोक एग्जायटीने पीडित होते. 

काय आहे कारणे?

एम्सचे  सायकायट्रीचे प्राध्यापक आणि या रिसर्चचे मुख्य डॉ. राजेश सागर म्हणाले की, 'डिप्रेशन आणि एंग्जायटी या दोन्ही समस्यांचं कारण आहे स्ट्रेस. तेच लहान मुलांबाबत सांगायचं तर त्यांना भिती दाखवल्याने, धमकावल्याने या दोन मानसिक समस्या बघायला मिळतात. इतकेच नाही तर सामाजिक परिस्थितीत होत असलेल्या बदलांमुळेही लोकांमध्ये स्ट्रेस वाढतो. आधी संयुक्त परिवार असायचे आणि लोक आपल्या समस्या एकमेकांसोबत शेअर करून मन हलकं करायचे. पण आता हे शक्य नाही.

कुणाला जास्त डिप्रेशनची समस्या

रिसर्चमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, मध्यम वयाचे लोक डिप्रेशनने अधिक पीडित असतात. सोबतच डिप्रेशनचा संबंध भारतात होणाऱ्या आत्महत्यामुळेही आहे. मानसिक आजारांचा आकडा 1990 ते 2017 दरम्यान दुप्पटीने वाढला आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य