शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याबाबतचे हे गैरसमज आपणही लहानपणापासून मानत आला आहात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 18:49 IST

मानवी आरोग्याबाबतच्या या काही चुकीच्या समजुती आपल्या लहानपणी कोणातरी आपल्या मनावर बिंबवल्या.

ठळक मुद्देलहानपणी ऐकलेल्या गोष्टी आपल्या कायम लक्षात राहतात.वडीलधाऱ्यांकडून आलेल्या काही गोष्टी आपण तश्याच पुढे नेत असतो.त्यापैकी काही खऱ्या असतात तर काही खोट्या. मात्र त्या तश्याच एकाकडून दुसऱ्याकडे जात राहतात.

मुंबई : आरोग्याच्याबाबतीत आपण नेहमीच जागृत असतो. इकडून तिकडून काही समजूतीही आपल्या कानावर आलेल्या असतात. या समजुतींमध्ये किती तथ्य असतं हे तपासण्याआधीच आपण त्या समजुती खऱ्या मानू लागतो. अशा कितीतरी गोष्टी आपण उगाचंच फॉलो करत असतो. अशाच काही गैरसमजुतींविषयी पाहुया.

थंड पाणी प्यायल्याने सर्दी होते

काहींना थंड पाण्याची फार अॅलर्जी असते. त्यांच्या मते, थोडंसं जरी थंड पाणी प्यायलो तरी लगेच नाक गळू लागतं. पण प्रत्यक्षात असं नसतंच. वातावरणातील तापमानाचा आपल्या शरीरावर परिणाम होत नसतो असंही म्हणतात. सर्दी किंवा इतर आजार हे वातावरणात असलेल्या किटाणूंमुळेच होतात.

दिवसात ८ ग्लास पाणी प्या

काही आहारतज्ज्ञ सांगतात की, दिवसात किमान ८ ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. आपलं शरीर दिवसाला २.५ लीटर पाणी पचवू शकतं. हे पाणी इतर अन्नपदार्थांच्यावाटे आपण प्यायलो तरी चालतं. मात्र काहीजण खाण्याव्यतिरिक्तही ८ ग्लास पाणी पितात, जे अत्यंत चुकीचं आहे.

 च्युईंगम पोटात सात वर्ष राहतं

आपल्यापैकी अनेकांची लहानपणापासून अशी समजुत आहे की च्युईंगम आपल्या पोटात जवळपास ७ वर्ष न पचता राहतं. पण ही अगदी चुकीची समज आहे. इतर अन्नपदार्थ ज्याप्रमाणे आपल्या विष्ठेतून बाहेर पडतात त्याचप्रमाणे आपण च्युईंगम  गिळल्यानंतर ते ही लगेच आपल्या ‌विष्ठेतून बाहेर पडत असतं.

जवळून टीव्ही पाहील्याने डोळे खराब होतात

आपण लहान मुलांना नेहमी ओरडतो की जवळ जाऊन टीव्ही पाहिल्याने डोळे खराब होतात, चष्मा लागतो. मात्र यात काहीच तथ्य नाहीए. जवळून टीव्ही पाहील्याने किंवा मोबाईल हाताळल्याने डोळ्यांना थकवा किंवा डोळ्यांवर ताण येऊ शकतो मात्र डोळे खराब होत नाहीत.

जेवल्यानंतर स्विमिंग करू नये

खाऊन झाल्यानंतर स्विमिंग करू नये असं म्हणतात. खाऊन स्विमिंग केल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. मात्र उपाशी पोटी पाण्यात उतरल्याने पायांना वात भरू शकतो. त्यामुळे पाण्यात उतरण्याआधी थोडेसे हलके पदार्थ खालले तरी चालतात.

शेव्हिंग केल्याने दाढी वाढत राहते

काहीजणांचं असं म्हणणं असतं की सतत शेव्हिंग केल्याने दाढीच्या केसांची ग्रोथ वाढत जाते आणि दाढीचा रंगही डार्क होत राहतो. पण सतत शव्हिंग केल्याने असं काहीच होत नसल्याचे जाणकार सांगतात.

अरबट-चरबट खाल्याने अल्सरचा धोका

आपण सतत बाहेरचं अरबट चरबट खात असतो. त्यामुळे आपल्याला अल्सर होण्याची शक्यता असते असं काही जण म्हणतात. मात्र फास्ट फूड खाल्याने अल्सर होत नसून आपल्या जेवणातून हेलिबॅक्टर पिलोरी हे विषाणू सेवन केल्यास अल्सर होतो. काहीवेळा असे विषाणु रस्त्यावर असलेल्या अन्नावर बसतात. म्हणून बाहेरचं पदार्थ खाऊ नये असं सांगितलं जातं.

प्रोबायोटीकने सर्दीचा धोका टळतो

सर्दी असणारे रोज प्रोबायोटीकची औषध घेत असतात. पण प्रोबायोटीकच्या सेवनाने सर्दी कायमची जात नसून केवळ सर्दी होण्याचं प्रमाण कमी होत राहतं. प्रोबायोटीक्स रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे सर्दी होण्याची शक्यता कमी होते. 

मासिक पाळीच्या काळात गर्भधारणा होत नाही

गर्भधारणेच्या वेळेस मासिक पाळी येत नाही, अशी काहींची समजूत असते. मात्र गरोदर राहिल्यावरही मासिक पाळी येऊ शकते किंवा मासिक पाळी येऊन गेल्यावरही गर्भधारणा होऊ शकते. 

गरोदरपणाचा काळ ९ महिन्यांचा असतो

असं म्हणतात की, नैसर्गिक प्रसुतीसाठी ९ महिने वाट पाहिली जाते. मात्र हा कालावधी ९ महिन्यांचा नसून ४० आठवड्यांचा असतो, म्हणजे ९ महिन्यांपेक्षाही अधिक काळ. गरोदर राहण्याच्या शेवटच्या मासिक पाळीपासून गरोदरपणाचे दिवस मोजले जातात. 

चॉकलेटमुळे पुरळ उठतात

पुरळ उठण्याची खूप कारणं आहेत. आपण स्ट्रेसमध्ये असलो तरीही आपल्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम दिसू लागतो. पण चॉकलेट किंवा तळलेल्या पदार्थांमुळे पुरळ उठत नसल्याचं त्वचा अभ्यासक सांगतात. स्नायूंनी स्रवलेल्या पदार्थांमुळेही चेहऱ्यावर पुरळ उठण्याची शक्यता असते. त्यामुळे चॉकलेटमुळे किंवा तळलेल्या पदार्थांमुळे पुरळ उठणे ही एक चुकीची समजूत आहे.

गुडघ्यांवरील आघाताने होतो संधीवात

संधीवात होण्याची फार कारणं आहेत. अजिबात व्यायाम न करणे, आहारात होणारी स्थित्यंतरं या कारणामुळे संधीवात होतो. तरुणपणात गुडघ्यांना दुखापत झाली की म्हातारपणात संधीवात होतो अशी काहींची समजूत आहे, जी पुर्णपणे खोटी आहे.

झोपल्याने पाठदुखी कमी होते

पाठदुखी कमी करण्याची बेड रेस्ट घेतला जातो. मात्र नियमित कामे करूनही पाठदुखी कमी करता येते. त्यासाठी सतत झोपून राहण्याची आवश्यकता नसते. 

अपरात्री जेवल्याने वजन वाढतं

रात्री-अपरात्री जेवल्याने वजन वाढतं अशी एक समजुत सगळ्याच घरात असते. मात्र दिवसातून आपण किती जेवतो, त्यामुळे किती कॅलरीज मिळतात हे महत्त्वाचं असतं. मात्र क्षमतेपेक्षा अधिक खाऊ नये.

सौजन्य - www.scoopwhoop.com

टॅग्स :Healthआरोग्यWomenमहिलाWaterपाणी