शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उशीशिवाय झोपुन तर पाहा, इतके आरोग्यदायी फायदे की उशी वापरणं विसरून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 13:33 IST

जर तुम्ही पाठदुखी, मानदुखी या समस्यांनी त्रस्त असाल तर सर्वप्रथम उशी घेऊन झोपण्याची सवय सोडा. उशी न घेेतल्यास काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ.

उशी घेऊन झोपणे कितीही आरामदायक वाटत असलं तरी त्यामुळे मान आणि पाठदुखीच्या तक्रारी होऊ शकतात.  कारण उशी घेऊन झोपल्यामुळे शरीराची स्थिती बिघडते. जर तुम्हीही पाठदुखी, मानदुखी या समस्यांनी त्रस्त असाल तर सर्वप्रथम उशी घेऊन झोपण्याची सवय सोडा. उशी न घेेतल्यास काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ.

पाठ दुखणार नाहीउशी घेऊन झोपल्याने कंबरेची पोझिशन बिघडते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पाठदुखी सुरू होते. उशीशिवाय झोपल्यास मान आणि पाठीचा कणा योग्य स्थितीत राहतो. ज्यामुळे पाठदुखी होत नाही.

मान दुखणार नाहीउशी घेऊन झोपल्याने मानेला आधार मिळत नाही. अशाप्रकारच्या चुकीच्या झोपेच्या स्थितीमुळे मान जड झाल्यासारखी वाटते आणि वेदना होतात.

अ‍ॅलर्जी होत नाहीज्या लोकांना धुळीची अ‍ॅलर्जी आहे. त्यांनी उशा वापरुच नयेत कारण उशीवरील धूळ, घाण झोपेच्या दरम्यान श्वासोच्छवासाद्वारे शरीराच्या आत पोहोचते आणि विविध समस्या निर्माण होतात.

मुरुमांपासून मुक्ती उशीचा वापर चेहऱ्यावर सतत होणाऱ्या मुरुमांमागील एक कारण असू शकते. अनेक वेळा आपण बेडशीट आणि उशीचे कव्हर जास्त काळ बदलत नाही.त्यामुळे धूळ, माती तसेच घाम, लाळ उशीवर तशीच राहते आणि ती चेहऱ्यावर जमते. त्यामुळे त्वचेवर मुरुम, पुरळ, सूज आणि लालसरपणा येतो.

डोकेदुखीपासून आरामउशी घेऊन झोपल्यामुळे सकाळी उठल्यानंतर डोके जड वाटते कारण मान व्यवस्थित न राहिल्याने मेंदुला रक्त पुरवठा नीट होत नाही. तसेच मेंदुतील ब्लड सर्क्युलेशनवरही त्याचा परिणाम होतो, त्यामुळे काही दिवस उशीशिवाय झोपा आणि मग फरक पाहा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स